वानाडाेंगरीत तरुण अभियंत्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST2021-05-30T04:08:28+5:302021-05-30T04:08:28+5:30
हिंगणा : अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी पाेलीस ठाण्यांतर्गतच्या वानाडाेंगरी ...

वानाडाेंगरीत तरुण अभियंत्याची आत्महत्या
हिंगणा : अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी पाेलीस ठाण्यांतर्गतच्या वानाडाेंगरी येथे शनिवारी (दि.२९) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
अक्षय पुरुषाेत्तम डाखळे (२५, रा. वानाडाेंगरी) असे मृताचे नाव असून, त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ताे किचन इंटेरियल फर्निचरचा व्यवसाय करीत हाेता. शनिवारी सर्व कुटुंबीय घरी असताना अक्षयने घराच्या वरच्या माळ्यावरील त्याच्या खाेलीत सिलिंग पंख्याला दाेराच्या साहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान, बराच वेळ हाेऊनही अक्षय खाली आला नाही म्हणून कुटुंबीयांनी वर जाऊन बघितले असता, ताे छताच्या लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. एमआयडीसी पाेलिसांना घटनेची सूचना देण्यात आली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. अक्षयच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास एमआयडीसी पाेलीस करीत आहेत.