वाठोेड्यातील तरुणासह तिघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:07 IST2021-04-07T04:07:32+5:302021-04-07T04:07:32+5:30
अंबानगर वाठोडा येथील रहिवासी सचिन सुरेश कावरे (वय १९) याने सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या ...

वाठोेड्यातील तरुणासह तिघांची आत्महत्या
अंबानगर वाठोडा येथील रहिवासी सचिन सुरेश कावरे (वय १९) याने सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. सुरेश जियालाल कावरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
सदरमधील लाल बगिचा खलासी लाईनमध्ये राहणारे कृष्णा यादवराव पिंपळकर (वय ५०) यांनी गळफास लावून घेतला. सोमवारी सकाळी ६ ते ११ च्या दरम्यान ही घटना घडली. माहिती मिळाल्यानंतर सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
तिसरी घटना पारडीतील स्वागतनगरात घडली. मंजू भारत रात्रे (वय २२) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी दुपारी १२.३० ला ही घटना उघडकीस आल्यानंतर चंद्रिकाबाई तोमन रात्रे (वय २८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----