दोन महिलांसह तिघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:09 IST2021-02-12T04:09:24+5:302021-02-12T04:09:24+5:30
वाठोेड्यातील साईबाबानगरातील रहिवासी सुनीलराव नारायणराव रोहणे (वय ५४) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी पहाटे १.४५ च्या सुमारास ही ...

दोन महिलांसह तिघांची आत्महत्या
वाठोेड्यातील साईबाबानगरातील रहिवासी सुनीलराव नारायणराव रोहणे (वय ५४) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी पहाटे १.४५ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कलावती सुनीलराव रोहणे (वय ५३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
वाठोेड्यातीलच मयूरनगरात राहणाऱ्या रत्नीबाई कमलाकर बिचवे (वय ५३) यांनी २५ जानेवारीला विष प्राशन केले होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी डॉक्टरांनी रत्नीबाई यांना मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
गणेशपेठेतील लोधीपुरा बजेरिया भागात राहणाऱ्या तृप्ती हर्षकुमार शाहू (वय ३१) यांनी ६ फेब्रुवारीला दुपारी १२.४५ च्या सुमारास स्वत:ला जाळून घेतले होते. गंभीर अवस्थेत त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना बुधवारी रात्री ९.४५ च्या सुमारास डॉक्टरांनी मृत घोषित केले. शेख तौफिक शेख शफी (वय २०) यांनी दिलेल्या सूचनेवरून गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---
उत्तर प्रदेशातील इसमाचा मृत्यू
नागपूर : उत्तर प्रदेशातील हरदेवपूर दातपूर (जि. भदई) येथील रहिवासी अजय शोभीनाथ यादव (वय ३६) हा व्यक्ती महिंद्रा ॲन्ड महिंद्रा कंपनीच्या पार्किंगच्या जागेत बुधवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास मृतावस्थेत मिळून आला. त्याच्यासोबत काम करणारा जोगेंद्र फुलचंद यादव (वय ३०, रा. जरुद्दीन निजामाबाद, जि. आजमगड) याने दिलेल्या सूचनेवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----