सैनिकाची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST2021-01-08T04:23:18+5:302021-01-08T04:23:18+5:30
कामठी : शहरातील सैनिक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या सैनिकाने त्याच्या खाेलीत छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी ...

सैनिकाची गळफास लावून आत्महत्या
कामठी : शहरातील सैनिक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या सैनिकाने त्याच्या खाेलीत छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ५) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
हेमलाल कुंजाम (२४, रा. खैरखेडा, छत्तीसगड) असे मृत सैनिकाचे नाव आहे. ते काही दिवसांपासून कामठी शहरातील छावणी परिसरात आलेल्या सैनिक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत हाेते. ते क्यांट एरिया, बंगला नंबर पी-२७, तिसऱ्या माळ्यावरील खाेलीत राहायचे. त्यांनी खाेलीतील छताच्या पंख्याला दुपट्ट्याच्या मदतीने गळफास लावून घेतल्याचे सकाळी निष्पन्न झाले. त्यामुळे इतर सैनिकांनी अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून कामठी पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.