गळफास लावून एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:07 IST2021-05-01T04:07:36+5:302021-05-01T04:07:36+5:30
बेला : नदीच्या काठावर असलेल्या पळसाच्या झाडाच्या फांदीला गळफास लावून एकाने आत्महत्या केली. ही घटना बेला (ता. उमरेड) पाेलीस ...

गळफास लावून एकाची आत्महत्या
बेला : नदीच्या काठावर असलेल्या पळसाच्या झाडाच्या फांदीला गळफास लावून एकाने आत्महत्या केली. ही घटना बेला (ता. उमरेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दतील चिखलापार शिवारात बुधवारी (दि. २८) दुपारी घडली.
नारायण लहानू ढाेणे (४८, रा. चिखलापार, ता. भिवापूर) असे मृताचे नाव आहे. ताे कुणालाही न सांगता घराबाहेर पडला. घरी वेळीच परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शाेध घेतला. दरम्यान, ताे या शिवारातील नांद नदीच्या तीरावरील पळसाच्या झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने नायलाॅन दोरीच्या मदतीने गळफास लावला हाेता. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी बेला पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस हवालदार अशाेक जाधव करीत आहेत.