गळफास लावून एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:27 IST2020-12-16T04:27:18+5:302020-12-16T04:27:18+5:30

देवलापार : शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना देवलापार पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव चिचदा ...

Suicide by strangulation | गळफास लावून एकाची आत्महत्या

गळफास लावून एकाची आत्महत्या

देवलापार : शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना देवलापार पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव चिचदा शिवारात साेमवारी (दि.१४) सकाळच्या सुमारास घडली.

हसन परदेशी काेडवते (३५, रा. कट्टा) असे मृताचे नाव असून, ताे आपल्या सासुरवाडीत राहात हाेता. गेल्या २-३ महिन्यांपासून त्याचे मानसिक संतुलन ढासळले हाेते. त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले हाेते. साेमवारी सकाळच्या सुमारास शाैचास जाताे असे सांगून ताे घराबाहेर गेला. दरम्यान सासऱ्याच्या शेतातील एका चिंचेच्या झाडाला नायलाॅन दाेरीच्या साहाय्याने गळफास लावून ताे मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी अरुण परदेशी काेडवते (३८, रा. कट्टा, रा. रामटेक) यांच्या तक्रारीवरून देवलापार पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस नाईक नागाेसे करीत आहेत.

Web Title: Suicide by strangulation