सामाजिक कार्यकर्ते शंकर सुगंध यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:09 IST2021-06-09T04:09:46+5:302021-06-09T04:09:46+5:30
नागपूर - काैटुंबिक कलहातून नैराश्य आल्याने सामाजिक कार्यकर्ते शंकर सुगंध (वय ४०) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी ...

सामाजिक कार्यकर्ते शंकर सुगंध यांची आत्महत्या
नागपूर - काैटुंबिक कलहातून नैराश्य आल्याने सामाजिक कार्यकर्ते शंकर सुगंध (वय ४०) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी या घटनेचे वृत्त उजेडात आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ निर्माण झाली. सुगंध छापरूनगरात राहत होते. ते लकडगंज पोलीस ठाण्याच्या शांतता समितीचे सदस्य होते. राजकीय पक्षाशीही ते संबंधित होते. मनिमळावू स्वभावाचे धनी असल्याने ते लकडगंज परिसरात चांगले ओळखले जायचे.
गेल्या काही महिन्यापासून ते आर्थिक कोंडीचा सामना करीत होते. त्यात कौटुंबिक कलह वाढल्याने ते जास्तच अस्वस्थ होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. कौटुंबिक कलहातून त्यांची पत्नी घरून माहेरी निघून गेली होती. परत यावी म्हणून सुगंध यांनी अनेक प्रयत्न केले. पोलीस स्टेशन, भरोसा सेलमध्येही समेट घडविण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यात यश न आल्याने ते एकटे पडल्यासारखे झाले होते. त्यातून सुगंध यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज लकडगंजचे ठाणेदार पराग पोटे यांनी व्यक्त केला.