तरुणीची विष प्राशन करून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST2021-04-07T04:09:37+5:302021-04-07T04:09:37+5:30
नागपूर - दुर्गानगर पारडी येथील उर्वशी दिलीप मेश्राम (वय २२) हिने विष प्राशन करून आत्महत्या केली. उर्वशीने नेमकी कोणत्या ...

तरुणीची विष प्राशन करून आत्महत्या
नागपूर - दुर्गानगर पारडी येथील उर्वशी दिलीप मेश्राम (वय २२) हिने विष प्राशन करून आत्महत्या केली. उर्वशीने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते पारडी पोलिसांकडून स्पष्ट होऊ शकले नाही. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू असल्याचे पारडी पोलीस सांगतात.
----
वर्ध्यातील वाहनचालकाचा मृतदेह आढळला
नागपूर - वर्धा येथील आर्वी नाका (जुना पाणी) परिसरात राहणारे जमिल मोहम्मद शेर मोहम्मद शेख (वय ४८) हे त्यांच्या टाटा मालवाहक वाहनात मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास मृतावस्थेत आढळले. मोहम्मद जाकिर मोहम्मद नजिर (वय ४९, रा. बडा ताजबाग) यांनी दिलेल्या माहितीवरून सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----
गळफास लावून आत्महत्या
नागपूर - कोतवाली महालमधील दसरा मार्गावर राहणारा निखिल कैलास उके (वय ३०) याने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
-----