शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’ची तयारी करणाऱ्या अकरावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

By योगेश पांडे | Updated: November 24, 2023 16:37 IST

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

नागपूर : ‘नीट’ची तयारी करणाऱ्या अकरावीतील एका विद्यार्थ्याने नागपुरात गळफास घेत आत्महत्या केली. तो मुळचा मध्यप्रदेशमधील होता व शिक्षणासाठी नागपुरात आला होता. आपला मुलगा डॉक्टर होईल असे त्याच्या पालकांचे स्वप्न होते. मात्र आता त्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अथर्व सत्येंद्र श्रीवास्तव (१७, ए टू झेड व्हेंचर पी.जी.हॉस्टेल, गोकुळपेठ) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुळचा मध्यप्रदेशमधील छिंदवाड्यातील प्रियदर्शिनी कॉलनी येथील रहिवासी होता. ‘नीट’च्या तयारीसाठी त्याने नागपुरात कोचिंग क्लासेस लावले होते व तो हॉस्टेलमध्ये रहायचा. गुरुवारी १२ वाजताच्या अगोदर त्याने त्याच्या खोलीत सिलींग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी त्याने दरवाजा न उघडल्याने त्याच्या हॉस्टेलमधील इतर विद्यार्थ्यांनी आवाज दिला. आतून प्रतिसाद न आल्याने वॉर्डनला माहिती देण्यात आली. खोली उघडल्यावर तो गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाला. त्याला मेडिकल इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

त्याने नेमक्या कुठल्या कारणामुळे आत्महत्या केली हे पोलिसांना कळू शकलेले नाही. घटनास्थळावरून सुसाईड नोटदेखील मिळाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचा फोन व इतर दस्तावेजांची चाचपणी करून त्याने हे पाऊल का उचलले याची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Deathमृत्यूStudentविद्यार्थीnagpurनागपूर