वृद्धासह तिघांची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST2021-06-16T04:10:25+5:302021-06-16T04:10:25+5:30

अजयनगरात राहणारे दिलीप गोविंदराव वाके (वय ६५) यांनी गळफास लावून घेतला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांच्या माहितीनुसार, ...

Suicide by hanging of three including an old man | वृद्धासह तिघांची गळफास लावून आत्महत्या

वृद्धासह तिघांची गळफास लावून आत्महत्या

अजयनगरात राहणारे दिलीप गोविंदराव वाके (वय ६५) यांनी गळफास लावून घेतला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांच्या माहितीनुसार, वाके एका पतसंस्थेत पदाधिकारी होते. आर्थिक घोटाळ्यामुळे ती संस्था चर्चेला आल्याने वाके अस्वस्थ झाले होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. विकास दिलीप वाके यांनी दिलेल्या सूचनेवरून अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

अंबाझरीतीलच पांढराबोडी परिसरात राहणारी सोनम अनिल नंदेश्वर (वय २२) हिने सोमवारी सायंकाळी गळफास लावून घेतला. अनिल नंदेश्वर यांच्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

अशाच प्रकारे गरोबा मैदान, छापरूनगर चाैकाजवळ राहणारे शंकर बबनराव नागमोते (वय ३६) यांनी मंगळवारी दुपारी १२ च्या पूर्वी गळफास लावून आत्महत्या केली. मनीषा शंकर नागमोते (वय २८) यांनी दिलेल्या माहितीवरून लकडगंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

करंट लागून महिलेचा करुण अंत

नागपूर : कपडे वाळविताना करंट लागल्याने संगीता अनिल पट्टे (वय ४८) यांचा करुण अंत झाला. जयताळ्यातील महापालिका शाळेजवळ राहणाऱ्या संगीता नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास ओले कपडे तारावर टाकत असताना त्यांना जोरदार करंट लागला. त्यामुळे त्यांना खामला चाैकातील एका खासगी इस्पितळात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी संगीता यांना मृत घोषित केले. अनिल मधुकर पट्टे (वय ५३) यांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

Web Title: Suicide by hanging of three including an old man