आॅनलाईन लोकमतनागपूर : विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन करण्याचा आरोप करून भर शिकवणी वर्गात काही जणांनी बेदम मारहाण केल्यामुळे अपमानित झालेल्या एका शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.संदीप वीरेंद्रनाथ विश्वास (वय ४२) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. जरीपटक्यातील सुवर्णनगर, गुरू नानक फार्मसीसमोर त्यांचे निवासस्थान आहे. ते पाचपावलीतील आवळेबाबू चौकात खासगी शिकवणी वर्ग चालवीत होते. सोमवारी दुपारी वर्ग सुरू असताना वर्गातील एका विद्यार्थिनीच्या मित्रासह तीन ते चार जण आले. त्यांनी वर्गात बसलेल्या विद्यार्थिनीसोबत तू अश्लील वर्तन करतो, असा आरोप करीत संदीप यांना बेदम मारहाण केली. वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार झाल्यामुळे मोठी गर्दी जमली. विद्यार्थी आणि चौकातील अनेकांसमक्ष मारहाण आणि घाणेरडा आरोप झाल्यामुळे संदीप व्यथित झाले. त्यांनी पाचपावली पोलीस ठाणे गाठले. तेथे सायंकाळी त्यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला. ते माहीत पडताच मारहाण करणारे आणि मुलीकडील अन्य काही जण पोलीस ठाण्यात पोहोचले. दोन्हीकडून रात्री १० वाजेपर्यंत आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. दरम्यान, अपमान झाल्याच्या भावनेमुळे रात्रभर अस्वस्थ राहिलेल्या संदीप यांनी त्यांच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी ११.१५ वाजता ते उघड झाल्यानंतर त्यांच्या वृद्ध आईने एकच आक्रोश सुरू केला. तो ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी जरीपटका पोलिसांना कळविले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.चॅटिंग की दुसरे काही...?ज्या मुलीसाठी हा प्रकार घडला, ती दहावीची विद्यार्थिनी आहे. गणिताच्या शिकवणीसाठी संदीप यांच्या वर्गात यायची, असे सांगितले जाते. संदीप तिला नको तसे मेसेज पाठवायचे, स्पर्श करायचे, असा आरोप मारहाण करणाऱ्या मंडळींनी केला आहे. दुसरीकडे मुलगी वर्गात बसून मोबाईलवर चॅटिंग करीत असल्यामुळे संदीप यांनी तिला झापले होते. त्यामुळे तिने मित्राला हा प्रकार सांगितला अन् नंतर हा दुर्दैवी प्रकार घडला, अशीही चर्चा आहे.
नागपुरात शिक्षकाची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:22 IST
आॅनलाईन लोकमतनागपूर : विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन करण्याचा आरोप करून भर शिकवणी वर्गात काही जणांनी बेदम मारहाण केल्यामुळे अपमानित झालेल्या एका शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.संदीप वीरेंद्रनाथ विश्वास (वय ४२) असे मृत शिक्षकाचे नाव ...
नागपुरात शिक्षकाची गळफास लावून आत्महत्या
ठळक मुद्देअश्लील वर्तनाचा आरोप : वर्गात मारहाण झाल्यामुळे व्यथित : अपमानित झाल्याने केला आत्मघात