विष पिऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:09 IST2021-09-19T04:09:14+5:302021-09-19T04:09:14+5:30

नागपूर - जरीपटक्यातील इंदोरा बाराखोली भागात राहणारे रमेश पुंडलिक दहाट (वय ५३) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी ...

Suicide by drinking poison | विष पिऊन आत्महत्या

विष पिऊन आत्महत्या

नागपूर - जरीपटक्यातील इंदोरा बाराखोली भागात राहणारे रमेश पुंडलिक दहाट (वय ५३) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी ६.३० ला ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या सूचनेवरून जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

शांतिनगरात इसमाचा आकस्मिक मृत्यू

नागपूर - शांतिनगरात राहणारे समीर खान हमीद खान (वय ४५) हे त्यांच्या राहत्या घरी शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास मृतावस्थेत आढळले. अब्दुल जिमल खान यांच्या तक्रारीवरून शांतिनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. समीर खान यांचा मृत्यू नेमका कसा झाला, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

-----

तलावात आढळला मृतदेह

नागपूर - गांधीसागर तलावात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. शुक्रवारी दुपारी आशिषकुमार तुकाराम केळवदे यांनी दिलेल्या माहितीवरून गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

Web Title: Suicide by drinking poison