बहिणीच्या विवाहित प्रियकरावर जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:12+5:302021-03-04T04:11:12+5:30
घरमालक व भाडेकरूवर गुन्हा दाखल नागपूर : महिलेचा अपमान करून तिचे सामान घराबाहेर फेकणाऱ्या घरमालक व भाडेकरूविराेधात धंताेली ...

बहिणीच्या विवाहित प्रियकरावर जीवघेणा हल्ला
घरमालक व भाडेकरूवर गुन्हा दाखल
नागपूर : महिलेचा अपमान करून तिचे सामान घराबाहेर फेकणाऱ्या घरमालक व भाडेकरूविराेधात धंताेली पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र महाजनचा धंताेली येथे फ्लॅट आहे. त्याने प्रदीप सिंह नामक व्यक्तीला ताे भाड्यावर दिला आहे. प्रदीप हा सुरक्षा एजेंसी चालवताे. लाॅकडाऊनच्या काळात प्रदीप यांचे कार्यालय बंद असल्याने महाजनने त्यांचे सामान हटविले व हा फ्लॅट ज्याेती सिरसाम नामक महिलेला भाड्याने दिला. त्यांच्याशी करार करून १ लाख २० रुपये डिपाॅझिट म्हणून घेतले. त्यानुसार ज्याेती यांनी त्यांचे साहित्य फ्लॅटमध्ये ठेवले. याबाबत माहिती मिळताच प्रदीप सिंह तेथे पाेहोचला. त्याने त्याची मुदत संपली नसल्याचे सांगत ज्याेती यांचे सामान बाहेर फेकले. त्यांना अपमानित करून फ्लॅटवर कब्जा केला. त्यामुळे ज्याेती यांनी महाजनला डिपाॅजिट दिलेले पैसे परत मागितले. मात्र त्याने टाळाटाळ करणे सुरू केले. त्यामुळे त्यांनी घरमालक व भाडेकरू सिंहविराेधात धंताेली पाेलिसात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी दाेघांविराेधात गुन्हा दाखल केला.