साखर पुन्हा महागणार !
By Admin | Updated: May 1, 2015 02:30 IST2015-05-01T02:30:02+5:302015-05-01T02:30:02+5:30
केंद्र सरकारने बुधवारी साखरेवरील आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर किमतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

साखर पुन्हा महागणार !
मोरेश्वर मानापुरे नागपूर
केंद्र सरकारने बुधवारी साखरेवरील आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर किमतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. किरकोळमध्ये २८ रुपये किलोची साखर पुन्हा ३२ रुपयांच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी उत्पादन घटल्यानंतर देशात साखरेचे भाव विक्रमी पातळीवर गेले होते, हे विशेष.
लोकसभा निवडणुकीदरम्यान किरकोळमध्ये साखरेचे भाव ३२ रुपये किलो होते. पण दहा महिन्याच्या कालावधीत भाव २५ रुपयांपर्यंत खाली होते. सध्या २८ रुपये आहेत. घाऊक बाजारात साखर (जाड) २६५० ते २६८०, साखर (बारीक) २५५० ते २५८० रुपये क्विंटल आहे.
निर्यातीसाठी हवे केंद्राचे सहकार्य
घाऊक बाजारातील व्यापारी म्हणाले, यंदा सिझन संपला असून आयात शुल्क वाढीचा परिणाम पुढील वर्षीपासून दिसून येईल. कारण गेल्या चार वर्षांपासून आवश्यकतेपेक्षा जास्त उत्पादन होत आहे. यावर्षी देशात २७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले. त्या तुलनेत विक्री २४३ लाख टन आहे. त्यामुळे विदेशातून साखर आयातीचा प्र्रश्नच नाही. ब्राझील जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. भारतात ब्राझील आणि थायलँड देशातून साखरेची आयात होते. सरकार रिफाईन साखरेवर सबसिडी देत नाही, पण कच्च्या साखरेवर प्रति किलो ४ रुपये सबसिडी देते. कच्च्या साखरेचा निर्यातीत भाव १८०० रुपये आहे. भाव न मिळाल्याने देशातील कारखान्यांमध्ये साखर पडून असल्याचे व्यापारी म्हणाले.