व्यवसायाची अशीही छाप...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST2021-09-12T04:11:41+5:302021-09-12T04:11:41+5:30

व्यवसायाची अशीही छाप...! व्यक्ती ज्या व्यवसायात आणि क्षेत्रात असेल तशी त्याची भाषा आणि वर्तन ठरते. नकळतपणे का होईना, ती ...

Such an impression of business ...! | व्यवसायाची अशीही छाप...!

व्यवसायाची अशीही छाप...!

व्यवसायाची अशीही छाप...!

व्यक्ती ज्या व्यवसायात आणि क्षेत्रात असेल तशी त्याची भाषा आणि वर्तन ठरते. नकळतपणे का होईना, ती बोलून जाते आणि विनोद निर्मिती होते. असाच प्रकार चंद्रपूर-नागपूर मार्गावर प्रवासादरम्यान घडला. प्रवासी घेऊन निघालेली एक ट्रॅव्हल्स मार्गातील एका पेट्रोल पंपावर प्रवाशांच्या लघुशंकेसाठी थांबली. स्वच्छतागृहात लावलेले बेसिन मात्र अपेक्षेपेक्षा बरेच उंच होते. त्यामुळे गैरसोय होत होती. हे बघून मित्रांच्या टोळक्यातील एकजण म्हणाला, लगता है, ‘शायद यह सब उँचे लोगों के लिए ही बनाया है.’ यावर एकमेकांना हसून दाद दिली जात असतानाच मार्केंटिंगच्या व्यवसायात काम करणारा दुसरा सहजपणे बोलून गेला, ‘आजकल मार्केट मे छोटे बच्चेही जादा आ रहे है. कंपनी ने सोचना चाहीए.’ अर्थात त्यांच्या बोलण्यातून निर्माण झालेला विनोद सहप्रवाशांनाही हसवून गेला.

Web Title: Such an impression of business ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.