शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस नारनवरे यांच्या नेतृत्वातील पथकाचे यश

By नरेश डोंगरे | Updated: March 20, 2025 18:52 IST

सीएसएसआर डेमो स्पर्धा : महाराष्ट्र एसडीआरएफने पटकावले द्वितीय स्थान

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य राखीव दलासह रेल्वे पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आयपीएस अधिकारी डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या नेतृत्वातील पथकाने शोध आणि बचावाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करून पुण्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावले.राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनात सीएसएसआर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एनडीआरएफच्या बटालियन पांच सुदुंबरे (पुणे) येथे १७ आणि १८ मार्चला ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्रासह देशातील राजस्थान, गुजरात, दीवदमन, मध्य प्रदेश आणि गोवा या सहा राज्यांच्या चमूंनी सतर्कतेसोबतच शोध आणि बचाव कशा प्रकारे करायचा, त्याचे प्रात्यक्षिक या स्पर्धेत सादर केले होते. त्यात एसडीआरएफ दीवदमनच्या पथकाने प्रथम तर महाराष्ट्राच्या पथकाने द्वितीय पुरस्कार पटकावला. राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरच्या समादेशक डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पीएसआय भंडारे आणि पीएसआय गावंडे यांनी या पथकाचे नेतृत्व केले होते. या यशाबद्दल राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एसआरपीएफ) सुरेश मेकला यांनी डॉ. नारनवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एका कार्यक्रमात ट्रॉफी प्रदान केली. यावेळी एनडीआरएफ बटालियन पुणेचे मोहसिन शाहेदी, संतोष शाहेदी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्पर्धेत लागला नंबर

शोध आणि बचावाचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या महाराष्ट्र आणि दीवदमन या दोन्ही राज्याच्या चमू आता अशाच प्रकारच्या राष्ट्रीय स्वरूपाच्या सीएसएसआर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरल्या आहेत. ही स्पर्धा दिल्ली येथे होणार असून, त्याही स्पर्धेत अव्वलस्थानी जाण्याचा मानस या पथकाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर