उपराजधानीत व्हायरल फिव्हर

By Admin | Updated: August 23, 2014 03:11 IST2014-08-23T03:11:50+5:302014-08-23T03:11:50+5:30

डेंग्यूच्या तापाने उपराजधानी फणफणली आहे. एकट्या मेडिकलमध्ये डेंग्यूचे २० वर रुग्ण उपचार घेत आहेत. यात बालकांची संख्या सर्वाधिक आहे.

Substantial viral fever | उपराजधानीत व्हायरल फिव्हर

उपराजधानीत व्हायरल फिव्हर

नागपूर : डेंग्यूच्या तापाने उपराजधानी फणफणली आहे. एकट्या मेडिकलमध्ये डेंग्यूचे २० वर रुग्ण उपचार घेत आहेत. यात बालकांची संख्या सर्वाधिक आहे. असे असताना महापालिकेच्या दफ्तरी जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत फक्त ३१ रुग्णांची नोंद आहे. मागील दोन वर्षांत डासांच्या दंशाने मलेरियाच्या तुलनेत डेंग्यू या रोगाचा फैलाव झपाट्याने झाला आहे. या रोगामुळे नागपुरातील जनता चांगलीच गारद झाल्याचे चित्र आहे. मागील वर्षी २०१२ मध्ये डेंग्यूचे २३७ रुग्ण तर पाच जणांचा मृत्यू तर २०१३ मध्ये ही संख्या २४० वर पोहचली. यात दोन जणांना प्राण गमवावे लागले. जानेवारी ते जुलै २०१४ या सात महिन्यात फक्त ३१ डेंग्यू पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद आहे. ही आकडेवारी महापालिकेची आहे, प्रत्यक्षात याच्या दुप्पट रुग्ण व मृत्यूची संख्या असल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीही मनपाला हनुमानगर झोन अंतर्गत वस्त्यांमध्ये सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. परंतु अद्यापही उपाययोजनेबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र आहे. राजाबाक्षालगत टीबी वॉर्डातील सार्वजनिक विहिरीचे सांडपाणी उघड्यावरून वाहते. सोबतच उघड्या नाल्या, तुंबलेल्या गटारी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मेडिकलमध्ये मागील वर्षी डेंग्यूच्या ४१ रुग्णांनी उपचार घेतला. या वर्षी हा आकडा दुपटीवर जाण्याची शक्यता आहे. कारण एकट्या बालरोग विभागाच्या वॉर्डात १५ च्यावर डेंग्यूचे रुग्ण तर वैद्यकशास्त्र विभागाच्या वॉर्डात ५ रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: Substantial viral fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.