उपविभागीय प्रयाेगशाळा शासकीय जागेवर स्थानांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST2021-07-11T04:07:59+5:302021-07-11T04:07:59+5:30
देवलापार : स्थानिक खासगी जागेवर तयार करण्यात आलेली उपविभागीय प्रयाेगशाळा (पाणी गुणवत्ता तपासणी केंद्र) शासकीय अर्थात पंचायत समितीच्या मालकीच्या ...

उपविभागीय प्रयाेगशाळा शासकीय जागेवर स्थानांतरित
देवलापार : स्थानिक खासगी जागेवर तयार करण्यात आलेली उपविभागीय प्रयाेगशाळा (पाणी गुणवत्ता तपासणी केंद्र) शासकीय अर्थात पंचायत समितीच्या मालकीच्या जागेवर स्थानांतरित करण्यात आली. या प्रयाेगशाळेत पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासली जाते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे विभागीय उपसंचालक मंगेश चाैधरी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) राजेंद्र भुयार, कार्यकारी अधिकारी किटे, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा डाॅ. वर्षा माने, भूवैज्ञानिक राजेश गावंडे, खंडविकास अधिकारी प्रदीप बमनाेटे, घाेडेस्वार, बाेरकर, स्वच्छ भारत अभियानाचे राजू मडामे, संजीवनी घारपांडे, महेंद्र बुरले, रवींद्र सुखदेवे आदी उपस्थित हाेते. यावेळी तज्ज्ञांनी पाण्याची गुणवत्ता, बचत आणि काटकसरीने वापर यासह अन्य बाबींवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रयाेशाळेतील अधिकारी, तंत्रज्ञ, कर्मचारी व नागरिक उपस्थित हाेते. कार्यालयाच्या आवारात अतिथींच्या हस्ते वृक्षाराेपणही करण्यात आले.