शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 21:39 IST

शासकीय दंत महाविद्यालयाच्या (डेंटल) मुलांच्या वसतिगृहातील ३६ पैकी २७ खोल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांसमोर निवासाचा प्रश्न उभा ठाकला आहे. याला घेऊन विद्यार्थ्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले असताना याच महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील समस्यांनी तोंडवर काढले आहे. गेल्या २० दिवसांपासून पाण्याच्या समस्येकडे कुणीच लक्ष देत नसल्याचे पाहून विद्यार्थिनींसह विद्यार्थ्यांनी गुरुवारी बादल्या, पाण्याच्या बॉटल्स घेऊन अधिष्ठाता कक्षासमोरच ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देनागपूर शासकीय दंत महाविद्यालय : २० दिवसांपासून मुलींच्या वसतिगृहात पाण्याची समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय दंत महाविद्यालयाच्या (डेंटल) मुलांच्या वसतिगृहातील ३६ पैकी २७ खोल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांसमोर निवासाचा प्रश्न उभा ठाकला आहे. याला घेऊन विद्यार्थ्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले असताना याच महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील समस्यांनी तोंडवर काढले आहे. गेल्या २० दिवसांपासून पाण्याच्या समस्येकडे कुणीच लक्ष देत नसल्याचे पाहून विद्यार्थिनींसह विद्यार्थ्यांनी गुरुवारी बादल्या, पाण्याच्या बॉटल्स घेऊन अधिष्ठाता कक्षासमोरच ठिय्या आंदोलन केले.विशेष म्हणजे, पाण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे  लक्ष या महाविद्यालयाकडे गेले. वैद्यकीय शिक्षण सचिवांपासून ते संचालकापर्यंत सर्वांनी याची दखल घेतल्याचे बोलले जात आहे. सायंकाळी वरिष्ठ प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांची समजूत काढल्यानंतर व पाणी समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर मुलांनी आंदोलन मागे घेतले.दंत रुग्णांसाठी शासकीय दंत रुग्णालय एक आशेचा किरण ठरले आहे. या रुग्णालयात केवळ विदर्भातीलच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. रुग्णसेवेचा दर्जा सांभाळला जात असला तरी मुलामुलींच्या वसतिगृहातील समस्यांकडे महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे येथील विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. ‘लोकमत’शी बोलताना विद्यार्थिनी म्हणाल्या, मुलींच्या वसतिगृहाच्या क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थिनी ठेवल्या जातात. यातच गेल्या दोन महिन्यापासून वसतिगृहात पाणी समस्या आहे. तिसऱ्या वर्षातील विद्यार्थिनींची परीक्षा सुरू असताना अनेक विद्यार्थिनी विना आंघोळ परीक्षेला जायच्या. तिकडून आल्यावर केवळ एक बादली पाणी मिळायचे. त्या स्थितीतही मुलींनी दिवस काढले. रुग्णालय प्रशासनाला याबाबत तीनदा पत्रही दिले. परंतु कुणीच दखल घेतली नाही. २० दिवसांपूर्वी ‘आरओ’ यंत्र नादुरुस्त झाले. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. मुलींनी बाहेरून पाण्याच्या कॅन विकत घेतल्या. परंतु या पाण्याने अनेकींना घशाचे विकार झाले. नाईलाजाने व आर्थिक भूर्दंड सहन करूनही आजही हे पाणी वापरले जात आहे. वापरण्याचे पाणीही उपलब्ध होत नसल्याने मुलांच्या वसतिगृहातून पाईप जोडून रात्री १२ वाजता मुली आपल्या बादल्या भरून पाण्याची व्यवस्था करतात. यातच दोन-चार दिवसांपूर्वी महाविद्यालय प्रशासनाने एकतर वापरण्यासाठी पाणी मिळेल किंवा पिण्यासाठी असा इशारा दिल्याने हे ठिय्या आंदोलन केले. २४ तास मुबलक पाणी द्या, प्रत्येक वॉटर कुलरला ‘प्युरीफायर’ यंत्र लावा व किमान स्वच्छता गृहाची नियमित स्वच्छता करा, एवढीच आमची मागणी आहे.पाण्यासाठी विद्यार्थी अधिष्ठात्यांच्या कक्षालाच घेराव घालून बसले होते. अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर परीक्षा घेण्यासाठी दिल्लीला असल्याने त्यांनी ज्या प्राध्यापकांवर जबाबदारी दिली होती त्यांनासुद्धा कक्षाकडे जाऊ देत नव्हते. बादली, पाण्याच्या बॉटल घेऊन विद्यार्थी सायंकाळी ७ वाजेपर्यंत बसून होते.पाणी समस्या निकाली काढणारमुलींच्या वसतिगृहातील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आजच्या आंदोलनाला गंभीरतेने घेत तातडीने एका वॉटर कूलरला ‘प्युरीफायर’ यंत्र बसविण्यात आले. उर्वरित तीन वॉटर कूलरलाही हे यंत्र लवकरच बसविण्यात येईल. डॉ. सिंधू गणवीरअधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन