शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी बनतील छात्र पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:02 IST

उपराजधानीत जबाबदार तरुण घडवायचे आहेत. विद्यार्थीदशेतील मुलांना सतर्क बनवून भविष्यातील जबाबदार नागरिक बनवायचे आहे. समाजात काय वाईट, काय चांगले आहे, त्याची त्यांना किशोरवयातूनच ओळख व्हावी. पोलीस आपले मित्र आहेत, अशी भावना त्यांच्यामध्ये रुजावी आणि विद्यार्थी पोलिसांशी जुळावेत, या संकल्पनेतून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘छात्र पोलीस’ हा उपक्रम सुरू केला आहे. यासंबंधाने सदरमधील एन कॉप्स अ‍ॅक्सीलन्स सेंटरमध्ये सोमवारी बैठक पार पडली.

ठळक मुद्देनागपूर शहर पोलिसांचा अभिनव उपक्रम : काय चांगले, काय वाईट, विद्यार्थ्यांना मिळणार धडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत जबाबदार तरुण घडवायचे आहेत. विद्यार्थीदशेतील मुलांना सतर्क बनवून भविष्यातील जबाबदार नागरिक बनवायचे आहे. समाजात काय वाईट, काय चांगले आहे, त्याची त्यांना किशोरवयातूनच ओळख व्हावी. पोलीस आपले मित्र आहेत, अशी भावना त्यांच्यामध्ये रुजावी आणि विद्यार्थीपोलिसांशी जुळावेत, या संकल्पनेतून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘छात्र पोलीस’ हा उपक्रम सुरू केला आहे. यासंबंधाने सदरमधील एन कॉप्स अ‍ॅक्सीलन्स सेंटरमध्ये सोमवारी बैठक पार पडली.बैठकीला सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, शहरातील सर्व पोलीस उपायुक्त, ठाणेदार तसेच १० शाळा अणि १० महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच प्राचार्य, महापालिकेच्या शिक्षणाधिकारी संध्या मलपट्टीवार, मैत्री परिवाराचे चंदू पेंडके आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमाची संकल्पना स्पष्ट करताना डॉ. उपाध्याय म्हणाले, फक्त अशिक्षित तसेच गरीब वर्गातील मंडळीच गुन्हेगारीकडे वळतात असा पूर्वी समज होता. अलीकडे विचार केल्यास उच्चभू्र आणि उच्चशिक्षित मंडळीसुद्धा गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे दिसून येते. वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्यामुळे दरवर्षी भारतात एक लाखापेक्षा जास्त लोकांचा अपघाती मृत्यू होतो. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी अमली पदार्थाच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहेत. देशासमोर दहशतवादाचा गंभीर प्रश्न आहे. या सर्व मुद्यांची जाणीव शालेय जीवनातूनच विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून छात्र पोलीस ही संकल्पना पुढे आणल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले. कारागृहात असलेल्यांपैकी फारच कमी गुन्हेगार जाणीवपूर्वक गुन्हेगारीत सक्रिय असतात. सुमारे ९५ टक्के गुन्हेगार अपघाताने गुन्हेगार बनलेले असतात, असे आपल्या निदर्शनास आले आहे. गुन्हे घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी गुन्हा घडूच नये, यासाठी प्रयत्न व्हायला हवे. प्रत्येक नागरिक हा साध्या वेशातील पोलीसच आहे. ही संकल्पना विद्यार्थीदशेपासून मुलांच्या मनात रुजल्यास भविष्यात गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी फारच उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे. त्यामुळेच छात्र पोलीस हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सहपोलीस आयुक्त कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी प्रारंभी प्रस्तावना केली तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन परिमंडळ ३ चे उपायुक्त राहुल माकणीकर यांनी केले.प्रायोगिक तत्वावर सुरुवातया उपक्रमाची प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात येत असून, त्यासाठी प्रारंभी १० शाळा अणि १० महाविद्यालयांना सहभागी करून घेण्यात आले आहे. संबंधीत पोलीस ठाण्यातील अधिकारी महिन्यातून दोनदा शाळा, महाविद्यालयात भेट देतील. तेथील विद्यार्थ्यांशी ते संवाद साधतील. त्यांच्या समस्या, जाणून घेतील आणि संबंधित विषयाच्या संबंधाने त्यांना मार्गदर्शन करतील. त्यांना स्पर्धा परिक्षा, नोकरीसंदर्भातदेखिल मार्गदर्शन करण्यात येईल. आवश्यकतेनुसार, या उपक्रमात वेळोवेळी दुरूस्ती केली जाईल.

 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीPoliceपोलिस