‘समर एक्सपो’ला विद्यार्थी, पालकांचा उदंड प्रतिसाद
By Admin | Updated: April 24, 2016 03:05 IST2016-04-24T03:05:31+5:302016-04-24T03:05:31+5:30
लोकमत मिशन अॅडमिशन ‘समर एक्सपो-२०१६’ला शनिवारी मोठ्या संख्येत विद्यार्थी व पालकांनी भेट देऊन शैक्षणिक माहितीचा लाभ घेतला.

‘समर एक्सपो’ला विद्यार्थी, पालकांचा उदंड प्रतिसाद
लोकमत मिशन अॅडमिशन : आज शेवटची संधी
नागपूर : लोकमत मिशन अॅडमिशन ‘समर एक्सपो-२०१६’ला शनिवारी मोठ्या संख्येत विद्यार्थी व पालकांनी भेट देऊन शैक्षणिक माहितीचा लाभ घेतला. लोकमत समर एक्सपोचे आयोजन सीताबर्डी झाशी राणी चौक येथील हिंदी मोर भवनात करण्यात आले आहे. येथे एकाच ठिकाणी शहरातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या करिअरला घेऊन विविध माहिती व संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या शिक्षण संस्थांमध्ये प्री-नर्सरी पासून आयआयटी, जेईईई ची तयारी करणाऱ्या शिक्षण संस्था सहभागी झाल्या आहेत. तसेच देशात होत असलेली प्रगती आणि परिवर्तनच्या सोबत नवी शिक्षण पद्धती, अभ्यास कुशलता, स्मरण शक्ती आणि बौद्धिक विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था या एक्सपोमध्ये सहभागी झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांच्या निराकरणावर व चालू घडामोडीवर प्रकाश टाकण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे सेमिनारही आयोजित केले जात आहे. या एक्सपोमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी ‘लकी ड्रॉ’चेही आयोजन करण्यात आले आहे. यात दरदिवशी पुरस्कार जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या एक्सपोची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत आहे. रविवारी या एक्सपोचा समारोप होणार आहे. येथे जेवढ्याही शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत, त्या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या हिताची माहिती उपलब्ध करून दिली आहे.