शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:38 IST

दारिद्र्यरेषेखालील, एससी, एसटी आणि सर्व मुलींना दरवर्षी शासनाच्या वतीने गणवेश देण्यात येतो़ परंतु, नॉन बीपीएल, ओबीसी संवर्गातील विद्यार्थी या गणवेशापासून वंचित राहायचे़ ही बाब विद्यार्थ्यांच्या मनात दुजाभाव करणारी आहे़ हे कारण पुढे करीत शिक्षण विभागाने २० लाखांचा निधी देऊन ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे़

ठळक मुद्देशेष फंडातून २० लाखांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारिद्र्यरेषेखालील, एससी, एसटी आणि सर्व मुलींना दरवर्षी शासनाच्या वतीने गणवेश देण्यात येतो़ परंतु, नॉन बीपीएल, ओबीसी संवर्गातील विद्यार्थी या गणवेशापासून वंचित राहायचे़ ही बाब विद्यार्थ्यांच्या मनात दुजाभाव करणारी आहे़ हे कारण पुढे करीत शिक्षण विभागाने २० लाखांचा निधी देऊन ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे़पहिल्या टप्प्यात साडेतीन हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळेल़ त्यानंतर निधीमध्ये वाढ करण्यात येईल़ प्रती गणवेशावर ६०० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे़ या संवर्गात २० हजार विद्यार्थी आहे़ यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही गणवेशाचा विषय मांडण्यात आला होता़ याबाबत स्वत: जिल्हा परिषदेचे वित्त व शिक्षण समिती सभापती उकेश चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता़ शासनाच्या सर्वशिक्षा अभियान योजनेअंतर्गत अशा शाळेत शिकणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील व आरक्षित प्रवर्गातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना व सर्व मुलींनाच गणवेश देण्यात येतात. खुल्या व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येत नाही. त्यांना स्वखर्चाने गणवेशाची रक्कम जुळवावी लागायची़ त्यामुळे मागील सत्रात जिल्हा परिषद शाळांतील शेकडो विद्यार्थी गणवेशाविनाच शाळेत यायचे़ यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीस गणवेशाचे अनुदान वितरित करण्यात यायचे़ त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून गणवेश खरेदी, शिलाई करणे अपेक्षित होते. त्यात खुल्या-ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही मुख्याध्यापक आपल्या स्तरावरून गणवेशाची जुळवाजुळव करून देत होते. मात्र, मागील सत्रापासून थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) लागू झाली़ आता ओबीसी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार असल्याने त्यांना वंचित राहावे लागणार नाही़ इतर विद्यार्थ्यांप्रमाणे खुल्या व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, यासाठी शेष फंडातून २० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली़ गरजेनुसार तो अधिक वाढविण्यात येईल़ उकेश चव्हाण, वित्त व शिक्षण सभापती, जि.प.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी