खासदाराच्या शाळेलाही हवेत मेळघाटातील विद्यार्थी

By Admin | Updated: July 11, 2014 01:18 IST2014-07-11T01:18:50+5:302014-07-11T01:18:50+5:30

मेळघाटातील शेकडो विद्यार्थ्यांना गुरांप्रमाणे वाहनांमध्ये कोंबून पळविले जात असल्याचा प्रकार आठवड्यापासून अव्याहतपणे सुरू आहे. बुधवारी रात्री १२ वाजता परतवाडा वाहतूक पोलिसांनी नागपूर नजीकच्या

Students from Melghat in the air of MP in the air | खासदाराच्या शाळेलाही हवेत मेळघाटातील विद्यार्थी

खासदाराच्या शाळेलाही हवेत मेळघाटातील विद्यार्थी

आठवड्यातील दुसरी घटना : नागपूरला नेले ११५ विद्यार्थी, भावना पब्लिक स्कूलला ५० विद्यार्थ्यांची रसद
नरेंद्र जावरे - अचलपूर
मेळघाटातील शेकडो विद्यार्थ्यांना गुरांप्रमाणे वाहनांमध्ये कोंबून पळविले जात असल्याचा प्रकार आठवड्यापासून अव्याहतपणे सुरू आहे. बुधवारी रात्री १२ वाजता परतवाडा वाहतूक पोलिसांनी नागपूर नजीकच्या उमरी येथील आश्रमशाळेत एका ट्रॅॅव्हल्समधून ११५ विद्यार्थ्यांची कोंबून नेताना सुटका केली.
विदर्भातील पुढाऱ्यांसह नेत्यांच्या आदिवासी अनुदानित आश्रम शाळांमध्ये गत आठवड्यापासून विद्यार्थ्यांना गुरांप्रमाणे कोंबून नेले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. बुधवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान धारणी तालुक्यातील ११५ विद्यार्थी सोनपरी ट्रॅॅव्हल्स एम.एच.११ ए.यू. २४४१ मध्ये कोंबून नेले जात होते. यामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
नागपूरनजीकच्या उमरी येथील अहल्याबाई होळकर आदिवासी आश्रम शाळेत हे विद्यार्थी नेले जात होते. त्यांच्यासोबत अजय पांडुरंग वाळके, ताराचंद दिग्रसे, सुशील गजभिये, सुरेश रेवतकर हे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी होते.
ट्रॅव्हल्सवर मॅरेज पार्टीचे फलक
धारणी तालुक्याच्या विविध खेड्यांतून या आदिवासी विद्यार्थ्यांना गुरांप्रमाणे कोंबून नेण्यासाठी सोनपरी नामक ट्रॅव्हल्सच्या दर्शनी भागावर ‘दिग्रसे परिवार’ असा फलक लावण्यात आला होता. पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांची नजर चुकविण्यासाठी सदर प्रकार करण्यात आला.
मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्यावर युवक काँग्रेसचे अमोल बोरेकर यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर वाहतूक सहायक निरीक्षक सतीश चौरे, शिपाई शे. बाबन, प्यारेलाल जवंजाळ यांनी नाकाबंदी करीत ट्रॅव्हल्स अडविली.
मेळघाटील आश्रमशाळा पडल्या ओस
मेळघाटात आदिवासी विभागामार्फत शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा मोठ्या प्रमाणात चालविण्यात येतात. त्या २६ जूनपासून ओस पडल्या आहेत. तर दुसरीकडे दररोज शेकडो विद्यार्थी गुरांप्रमाणे कोंबून पळविले जात आहेत.
लोकमतची भीती
गत आठवड्यापासून ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या या प्रकाराने विदर्भातील आश्रम शाळा व्यवस्थापकांचे धाबे दणाणले असून मेळघाटात आश्रम शाळा असताना त्याच आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या बाहेर जिल्ह्यात विद्यार्थ्यांची पळवा-पळवीबद्दल 'लोकमत' प्रतिनिधीला शिक्षकांनी ओळख करुन घेताच त्यांच्यात दहशत दिसून आली. गुरुवारी रात्री १.३० वाजता ट्रॅव्हल्समधील कोंबलेले विद्यार्थी परतवाडा येथून दोन लहान गाड्यांमध्ये बसविण्यात आल्यावर उमरी येथे पाठविण्यात आले.
तीन हजार रुपये दंड
परतवाडा वाहतूक पोलिसांनी ही ट्रॅव्हल्स चिखलदरा स्थानाकानजीक थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने भरधाव वेगाने वाहन पळविले. चालकाजवळ वाहन परवाना नसतानासुध्दा ११५ विद्यार्थी बसविण्यात आले होते. पोलिसांनी परमीटचे उल्लंघन केल्याचा गुन्हा मोटर वाहन कायद्यानुसार दाखल करुन तीन हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.

Web Title: Students from Melghat in the air of MP in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.