विद्यार्थ्यांनो संधीचं सोनं करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:32 IST2017-10-10T00:32:14+5:302017-10-10T00:32:29+5:30
यशाची पहिली पायरी अपयश आहे. त्यामुळे अपयश आले की खचून जाऊ नका. संधी मिळत असतात. फक्त त्या संधीचं सोन करा, असे आवाहन आ. अनिल सोले यांनी केले.

विद्यार्थ्यांनो संधीचं सोनं करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यशाची पहिली पायरी अपयश आहे. त्यामुळे अपयश आले की खचून जाऊ नका. संधी मिळत असतात. फक्त त्या संधीचं सोन करा, असे आवाहन आ. अनिल सोले यांनी केले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग, फॉर्च्युन फाऊंडेशन व डॉ. आंबेडकर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकर कॉलेजच्या सभागृहात व्यवसाय शिक्षण आणि आयटीआय पास-नापास उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
यावेळी शिक्षक आमदार ना.गो. गाणार, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, सहसंचालक चंद्रकांत निनाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे प्रामुख्याने उपस्थित होते.
आ. अनिल सोले म्हणाले, विद्यार्थ्यांनी झोप उडविणारे स्वप्न पाहायला हवे. आपल्यातील स्कील डेव्हलप करायला हवे.
आ. गाणार म्हणाले, विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये, आपली मानसिकता बदलावी.
संदीप जोशी यांनी कौशल्य असेल तर कौतुक होईल, असे स्पष्ट केले.
सहसंचालक निनाळे यांनी विद्यार्थ्यांना रोजगारासाठी घराबाहेर पडणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी यशस्वी विद्यार्थी गुलाम खान, कीर्तिराज गरुड व अतुल बारापात्रे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ. पी.सी. पवार, उपप्रचार्य कबीर रावळेकर, मिलिंद हाडे, प्रमोद ठाकरे, प्रदीप लोणारे, रवी मेहंदळे, सच्चिदानंद दारुंडे, खेमलाल चांदेकर, दिगांबर पुंड, प्रा. गिरीश देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
संचालन मीना मोरोणे यांनी केले. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुधा ठोंबरे यांनी आभार मानले.
५९३ उमेदवारांना रोजगार
या मेळाव्यात १६ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ८५० उमेदवार उपस्थित होते. त्यातून ५९३ उमेदवारांना आॅन द स्पॉट रोजगार प्राप्त झाला.