शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

चिल्यापिल्यांनी गजबजल्या शाळा : नवागतांचे झाले स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:23 IST

दोन महिन्यांच्या अवकाशानंतर आज शहरातील शाळा चिल्यापिल्यांनी गजबजून गेल्या. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा म्हणून शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शाळेत प्रवेशोत्सव साजरा झाला.

ठळक मुद्देप्रवेशोत्सवासाठी शाळा सजल्या : दोस्त भेटले, धम्माल झाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन महिन्यांच्या अवकाशानंतर आज शहरातील शाळा चिल्यापिल्यांनी गजबजून गेल्या. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा म्हणून शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शाळेत प्रवेशोत्सव साजरा झाला. फुगे, फुले, कार्टून, पताका, रांगोळ्यांनी आज शाळा सजल्या होत्या. पहाटेपासूनच शिक्षक मंडळींची प्रवेशोत्सवाची लगबग सुरू झाली होती. एक एक करता विद्यार्थी जमू लागले, विद्यार्थ्यांची किलबिल सुरू झाली. जुन्या मित्रांची पुन्हा गाठभेट झाली. चर्चा रंगल्या, मस्ती सुरू झाली. अशात शिट्टी वाजली, मुलांनी धावत-पळत मैदान गाठले. शाळेची प्रार्थना झाली. वर्ग शिक्षकांनी प्रत्येकाचे पुष्प देऊन स्वागत केले. कुठे मिठाई तर कुठे चॉकलेटने विद्यार्थ्यांचे तोंड गोड केले. प्रवेशोत्सवाचा आनंद विद्यार्थ्यांनी मनमुराद लुटला.  

सामाजिक उपक्रम राबविलेप्रवेशोत्सवाचा पहिला दिवस आनंदात साजरा करण्याबरोबरच मुलांना सामाजिक जाणीव व्हावी म्हणून सामाजिक उपक्रमही राबविले. काही शाळांनी मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करून घेतले. व्यसनमुक्तीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर प्रदूषण आणि स्वच्छतेच्या बाबतीत मार्गदर्शनही केले.प्रार्थना, शिस्त आणि मार्गदर्शनशाळा म्हटले की शिस्तीचा भाग महत्त्वाचा ठरतो. प्रवेशोत्सव असला तरी शाळेमध्ये शिस्त दिसून येत होती. प्रार्थनेसाठी मुले शिस्तीत रांगेत लागली. प्रार्थना झाल्यानंतर नवीन मुलांचा परिचय शाळेने करून घेतला. मुख्याध्यापक, संस्थेचे संचालक यांनी मुलांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन करीत प्रवेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी घेतली शपथमनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून, त्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनापासून मुक्त राहावे म्हणून शपथ देण्यात आली. प्रसंगी उपस्थित नगरसेविका व झोन सभापती लता काटगाये, क्रीडा सभापती प्रमोद चिखले, समितीच्या अध्यक्ष किरण इंगोले, प्राचार्य रजनी देशकर यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.शाळेत भरल्या पंगती 
वाडी समूह साधन केंद्रा अंतर्गत उच्च प्रा. शाळा सोनबानगर येथे प्रवेशोत्सवाला विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तर जि.प. उच्च प्रा. शाळा सुराबर्डी येथे विद्यार्थ्यांच्या पंगती भरल्या. पोषण आहारात गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला. लाव्हा येथेही विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी पं.स. नागपूरचे उपसभापती सुजित नितनवरे, गटविकास अधिकारी किरण कोवे, केंद्रप्रमुख शरद भांडारकर, सरपंच ज्योत्स्ना नितनवरे, सुनिता मेश्राम, संतोष शेंडे, सुनंदा चोखांद्रे, पुरुषोत्तम गोरे, रामेश्वर मुसळे, अनिल नाईक, रवींद्र टेकाम, प्रभा भिसे, अंजना धांडे आदी उपस्थित होते.

लोकमतने केले स्वागत  

 लोकमतने दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.  नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या उपक्रमात शहरातील अनेक शाळांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. लोकमतच्या साक्षीने  प्रवेशोत्सवात आणखी बहार आणली. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा