विद्यार्थ्यांनी केली ‘सीड बाॅल’ची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:25+5:302021-06-20T04:07:25+5:30

पारशिवनी : नवेगाव (खैरी), ता. पारशिवनी येथील राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय व याच विद्यालयाद्वारे संचालित पेंच ...

The students created 'Seed Ball' | विद्यार्थ्यांनी केली ‘सीड बाॅल’ची निर्मिती

विद्यार्थ्यांनी केली ‘सीड बाॅल’ची निर्मिती

पारशिवनी : नवेगाव (खैरी), ता. पारशिवनी येथील राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय व याच विद्यालयाद्वारे संचालित पेंच निसर्ग मित्र मंडळाच्यावतीने ‘झाडे लावा, पर्यावरण वाचवा’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शीलादेवी (ता. पारशिवनी) येथे १,५३१ ‘सीड बाॅल’ तयार केले आहेत.

विद्यार्थ्यांनी कडुनिंब, चिंच, घोगल, आकोल, गरुड वृक्ष (मोखा), गुलमोहोर, अमलतास (बहावा), सिंदी, करंज, बेल, पळस, रोहण, कदंब, कशिया, ड्युरांडा, बिहाडा, चारोळी, रिठा, अर्जुन, सेमल, लेंडिया व आंबा अशा देशी झाडांच्या बिया मातीच्या गाेळ्यांमध्ये घालून त्याचे ‘सीड बॉल’ तयार केले आहेत. विद्यार्थी काही दिवसांनी हे ‘सीड बाॅल’ जंगल व माेकळ्या जागेवर टाकणार आहेत. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे अवाहनही विद्यार्थ्यांनी केले आहे. या कार्यात विद्यार्थ्यांना पोलीस पाटील रक्षणा गजभिये, अनिकेत मैंद, नीरज राऊत, अरुण नेकाम, दीपिका धुर्वे, प्रिया आरसे, नंदिनी आरसे, दीपक धुर्वे, अजय बेलवंशी, विजय बेलवंशी, प्रणय आरसे, आदित्य बेलवंशी, रंजना टेकाम, अंकुश उईके, अजित बेलवंशी, कार्तिक, रोहन बांबोडे, कृश, निशांत धुर्वे, साहिल, पंकज, संतोषी धुर्वे, सावित्री आरसे, पुष्पा धुर्वे, रामेश्वर उईके, आनंद धुर्वे यांनी सहकार्य केले.

Web Title: The students created 'Seed Ball'