शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठातील गैरव्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांचा संताप ; अभाविपचा विद्यापीठावर धडक मोर्चा

By आनंद डेकाटे | Updated: November 13, 2025 17:32 IST

Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या अनियमितता आणि अव्यवस्थेविरोधात गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने जोरदार ‘धडक मोर्चा’ काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठात सुरू असलेल्या अनियमितता आणि अव्यवस्थेविरोधात गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने जोरदार ‘धडक मोर्चा’ काढला. हा मोर्चा रविनगर मैदानातून सुरू होऊन विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत गेला, जिथे विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. नागपूरसह भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले.

मोर्चाचे नेतृत्व विदर्भ प्रांत मंत्री पायल किनाके यांनी केले. त्यांनी यावेळी विद्यापीठात उशिरा प्रवेशप्रक्रिया पार पडणे, अपूर्ण अभ्यासक्रम असतानाच परीक्षा घेणे, कायमस्वरूपी शिक्षकांची भरती न करणे, तात्पुरत्या शिक्षकांची नेमणूक पात्रतेचे निकष न पाळता करणे, इतर पदांची भरती वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणे, तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणयोग्य रीतीने अंमलात न आणणे अशा आरोपांची यादी मांडली.

विद्यार्थ्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून विद्यार्थी संघ निवडणुका घेतल्या जात नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. प्रणाली गोमासे यांनी विद्यापीठातील सुविधा नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, विद्यापीठात ना बायोमेट्रिक उपस्थिती यंत्र आहेत, ना सीसीटीव्ही कॅमेरे, आणि ना विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीन उपलब्ध आहेत. “स्मार्ट क्लासरूम” नावाला आहे, पण अजूनही जुन्या हिरव्या फळ्यावरच शिकवणी चालते, असे त्यांनी नमूद केले. याशिवाय अनिकेत दादंडे, शिवम काले, मोसम पटले, दीपांशू गौर आणि प्रणित सदाफले यांनीही विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला.

विद्यापीठाचे रजिस्ट्रार राजू हिवसे यांनी मोर्चाला सामोरे जाऊन निवेदन स्वीकारले. त्यांनी या सर्व मागण्या कुलगुरू डॉ. माधवी खोडे यांच्यासमोर मांडण्याचे आश्वासन दिले आणि समस्यांवर उपाय शोधण्याची ग्वाही दिली. यावर एबीव्हीपीने स्पष्ट केले की विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू राहील. संचालन वीरेंद्र पौणीकर यांनी केले.

अशा आहेत प्रमुख मागण्या- विद्यापीठाचा शैक्षणिक दिनदर्शिका वेळेत तयार व्हावी- प्रवेशाची अंतिम तारीख १५ ऑगस्ट निश्चित करावी.- प्रवेशप्रक्रियेची सर्व माहिती विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर पाठवावी.- विद्यार्थी संघ निवडणुका तातडीने सुरू कराव्यात.- प्रवेशप्रक्रियेत दलाल व एजंट्स यांच्यावर कडक कारवाई करावी.- शुल्क निर्धारण पारदर्शक व्हावे आणि माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करावी.- परीक्षा व पुनर्मूल्यांकनाचे निकाल ४५ दिवसांत जाहीर करावेत आणि दोषींवर कारवाई व्हावी.- परीक्षा केंद्रांवर मूलभूत सुविधा पुरवाव्यात.- एनईपी सुधार समिती स्थापन करून स्थानिक भाषांमध्ये अभ्यासक्रम सुरू करावेत.- कायमस्वरूपी प्राध्यापक व कर्मचारी यांची भरती तातडीने करावी.

English
हिंदी सारांश
Web Title : ABVP protests Nagpur University's mismanagement; demands action on irregularities.

Web Summary : ABVP staged a protest against Nagpur University's mismanagement, citing delayed admissions, incomplete syllabus exams, staff shortages, and lack of facilities. They demanded timely academic calendars, transparent fee structures, and student union elections. The registrar assured them the issues would be addressed.
टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूरuniversityविद्यापीठ