विद्यार्थ्याचे अपहरण करून मारहाण

By Admin | Updated: November 15, 2015 02:07 IST2015-11-15T02:07:30+5:302015-11-15T02:07:30+5:30

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला डांबून ठेवत काही गुंडांनी बेदम मारहाण केली.

Students abducted by abduction | विद्यार्थ्याचे अपहरण करून मारहाण

विद्यार्थ्याचे अपहरण करून मारहाण

गंभीर जखमी, सोनसाखळी हिसकावली : तक्रार देऊनही गुन्हा दाखल नाही
नागपूर : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला डांबून ठेवत काही गुंडांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर देवनगर चौकातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंदार इंगळे (वय १९) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्याच्या वडिलांनी या प्रकरणाची तातडीने माहिती देऊनही प्रतापनगर पोलिसांनी रात्री ९.३० पर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता.
छत्रपती चौकाजवळ राहणारा मंदार रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा द्वितीय वर्षांचा विद्यार्थी आहे. लक्ष्मीनगर पाण्याच्या टाकीजवळ कुख्यात डकाह टोळी राहते. या टोळीतील एका सदस्यासोबत मंदारचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर, शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास मंदार माटे चौकाजवळ उभा असताना आरोपी करण डकाह आणि त्याच्या साथीदारांनी त्याला सिनेस्टाईल घेराव घातला. त्याला लक्ष्मीनगरातील पाण्याच्या टाकीजवळ नेले. तेथे एका रूममध्ये बंद करून मंदारला आरोपींनी बेदम मारहाण केली. त्याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली. रॉडचे फटके पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मंदारला आरोपींनी सोडून दिल्यानंतर त्याने आपल्या नातेवाईकांना फोन केला. त्यानंतर त्याचे मित्र आणि नातेवाईक घटनास्थळाजवळ पोहचले. मंदारच्या वडिलांनी माहिती देऊन मदतीची विनंती केल्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव आपल्या सहकाऱ्यांसह लक्ष्मीनगरात पोहचले. त्यांनी गंभीर जखमी असलेल्या मंदारला देवनगरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रतापनगर पोलिसांनाही या गंभीर प्रकाराची माहिती दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Students abducted by abduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.