‘व्हीएनआयटी’ प्रशासनाला विद्यार्थ्यांचा दणका
By Admin | Updated: April 10, 2015 02:15 IST2015-04-10T02:15:11+5:302015-04-10T02:15:11+5:30
देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्था असलेल्या ‘व्हीएनआयटी’मध्ये (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) विद्यार्थ्यांनी शुल्कवाढ व मूलभूत सुविधांचा अभाव

‘व्हीएनआयटी’ प्रशासनाला विद्यार्थ्यांचा दणका
नागपूर : देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्था असलेल्या ‘व्हीएनआयटी’मध्ये (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) विद्यार्थ्यांनी शुल्कवाढ व मूलभूत सुविधांचा अभाव या मुद्यावरून गुरुवारी आंदोलन केले. केंद्रीय अनुदान असताना वसतिगृहाच्या शुल्कात तिप्पट वाढ करण्यात आली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
‘व्हीएनआयटी’त विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी विशेष पुढाकार घेण्याची आवश्यकता असताना शुल्कवाढ करण्यात आली आहे. शिवाय अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असून संगणक केंद्राचा लाभ देण्यात येत नाही. प्रशासनाने वसतिगृहाची शुल्कवाढ मागे घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. यावेळी ‘व्हीएनआयटी’ परिसरात विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली. कुलसचिव निखिल चिंगलवार यांनी यासंबंधी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
यासंदर्भात कुलसचिवांशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)