Student Suicide in VNIT | व्हीएनआयटीमध्ये विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या
व्हीएनआयटीमध्ये विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : परीक्षेत नापास झाल्यामुळे व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. मृत गणपुरम व्यंकटा सूर्यनारायणा (१९) कोरबा, छत्तीसगड येथील रहिवासी आहे. सूर्यनारायण बीटेक मायनिंगच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. त्याने बुधवारी मित्रांसोबत चर्चा केली होती. त्यानंतर तो होस्टेलमध्ये गेला. सायंकाळी तो परत न आल्याने मित्र चिंतित झाले. त्यांनी फोन केल्यानंतर सूर्यनारायणने प्रतिसाद दिला नाही. मित्रांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडल्यानंतर त्याने फाशी लावल्याचे दिसून आले. घटनेची सूचना बजाजनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी होस्टेलला पोहोचून सूर्यनारायणचे शव मेडिकलला रवाना केले. तो परीक्षेत नापास झाला होता. याच कारणामुळे त्याने आत्महत्या केल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.


Web Title: Student Suicide in VNIT
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.