शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नागपूर जिल्ह्यातील देवलापार भागात तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:49 IST

तलावात पोहायला उतरलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांनी पाण्यातील गाईची शेपटी पकडली आणि पोहायला सुरुवात केली. दोघांनाही गाईने खोल पाण्यात नेले व मागचा भाग हलविला. त्यामुळे दोघेही बुडाले. यातील एकाला वाचविण्यात गुराख्याला यश आले तर दुसऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंदेवाणी शिवारात शुक्रवारी सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देसिंदेवाणी शिवारातील घटना : पोहताना गाईची शेपटी पकडणे अंगलट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तलावात पोहायला उतरलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांनी पाण्यातील गाईची शेपटी पकडली आणि पोहायला सुरुवात केली. दोघांनाही गाईने खोल पाण्यात नेले व मागचा भाग हलविला. त्यामुळे दोघेही बुडाले. यातील एकाला वाचविण्यात गुराख्याला यश आले तर दुसऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंदेवाणी शिवारात शुक्रवारी सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास घडली.साहील अनिल वरठी (१०, रा. सिंदेवाणी, ता. रामटेक) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. साहील सिंदेवाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शळेतील इयत्ता चौथीत शिकायचा. साहील हा त्याचे मित्र राम भोजलाल भलावी, खुशाल श्रीचंद कोकोडे व आयुष विनोद वरठी, तिघेही रा. सिंदेवाणी यांच्यासोबत गावालगतच्या तलावात पोहायला गेला होता. साहील व आयुष पोहायला तलावात उतरले तर राम व खुशाल किनाऱ्यावर बसून होते.काही वेळातच पाणी पिण्यासाठी आलेली गाय तलावात शिरली. दोघेही गाईची शेपटी पकडून पोहू लागले. शिवाय, गाईसोबत खोल पाण्यात गेले. गाईने मागचा भाग हलविल्याने दोघांच्याही हातातील शेपटी सुटली व ते गटांगळ्या खाऊ लागले. गाय मात्र पाण्याबाहेर निघून गेली. ही बाब लक्षात येताच जवळच असलेला ओमप्रकाश रामटेके, रा. सिंदेवाणी याने पाण्यात उडी घेऊन दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याने सुरुवातीला आयुषला पकडून बाहेर आणले आणि परत पाण्यात जाऊन साहील शोध घेऊ लागला. परंतु, साहील खोल पाण्यात गेल्याने त्याला गवसला नाही. माहिती मिळताच साहीलचे कुटुंबीय, ग्रामस्थ, ठाणेदार सुरेश मट्टामी, उपनिरीक्षक सुनील पाटील, शिपाई रोशन नारनवरे यांनी घटनास्थळ गाठून साहीलचा शोध घ्यायला सुरुवात केली.अखेर मृतदेह गवसलासाहीलला शोधण्यासाठी स्थानिक मासेमारी व डोंग्याची मदत घेण्यात आली. शेवटी चार तासांच्या शोधकार्यानंतर साहीलचा मृतदेह गवसला. उत्तरीय तपासणीप्रक्रिया आटोपल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निखिल वरठी (१५) हा साहीलचा मोठा भाऊ होय. तो २२ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे. याबाबत त्याचे वडील अनिल वरठी यांनी देवलापार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मात्र, तो अद्यापही गवसला नाही.

टॅग्स :Deathमृत्यूStudentविद्यार्थी