विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:11 IST2021-09-21T04:11:05+5:302021-09-21T04:11:05+5:30

कळमेश्वर : विद्यार्थ्याने मानसिक तणावातून त्याच्या राहत्या घरी छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील ...

Student commits suicide by hanging | विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

कळमेश्वर : विद्यार्थ्याने मानसिक तणावातून त्याच्या राहत्या घरी छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाेंडखैरी येथे शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

ओम सुनील राेडे (१८, रा. बाजार चाैक, गाेंडखैरी, ता. कळमेश्वर) असे मृताचे नाव आहे. ओम स्पर्धा परीक्षेची तयारी करीत हाेता. त्यामुळे काही दिवसापासून ताे मानसिक तणावात हाेता, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. याच तणावातून त्याने घरी कुणीही नसताना छताला दाेरीच्या मदतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार उईके करीत आहेत.

Web Title: Student commits suicide by hanging