पिस्तूल, एमडीसह विद्यार्थ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST2021-02-08T04:08:25+5:302021-02-08T04:08:25+5:30
एनडीपीएस सेलच्या दोन कारवाया : ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त नागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने कॉलेजच्या विद्यार्थ्यासह दोन युवकांना ...

पिस्तूल, एमडीसह विद्यार्थ्यास अटक
एनडीपीएस सेलच्या दोन कारवाया : ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने कॉलेजच्या विद्यार्थ्यासह दोन युवकांना एमडी तस्करीत अटक केली आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्याकडून पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. दोन्ही कारवाईत ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
टेकडी लाइन सीताबर्डी येथील निखिल संतोष सावडिया (२१) बारावीचा विद्यार्थी आहे. त्याची आरोपी मृणाल गजभियेशी मैत्री आहे. मृणाल सीताबर्डीत फुटपाथवर कपडे विकतो. तो एमडीच्या तस्करीत आधीही पकडला गेला आहे. मृणालने निखिलला एमडी आणि पिस्तूल दिले होते. त्याची माहिती एनडीपीएस सेलला मिळाली. त्यांनी निखिलला अटक करून १.४७ लाखांची एमडी, पिस्तूल, काडतूस आणि दुचाकीसह २.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. निखिलच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वीच अपघातात मृत्यू झाला आहे. त्याचा परिवार पगडी बांधण्याचे काम करतो. दुसऱ्या घटनेत एनडीपीएस सेलने शेख साहिल शेख मेहमूद (२१) रा. रजा टाउन कपिलनगरला अॅक्टिव्हा गाडीवर जाताना पकडले. त्याची झडती घेतली असता, १७ हजारांची एमडी जप्त करण्यात आली. जप्त केलेली एमडी कुख्यात मकसुदजवळून खरेदी केली होती. मकसुद एका प्रकरणात पोलिसांना हवा आहे. तो उत्तर प्रदेशातून एमडीची तस्करी संचालित करतो. ही कारवाई पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, सहायक पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरले, सूरज सुरोसे, हवालदार प्रदीप पवार, राजेश देशमुख, समाधान गीते, नामदेव टेकाम, शिपाई विनोद गायकवाड, नितीन मिश्रा, कपिलकुमार तांडेकर, अश्विन मांगे, सगीर शेख, नितीन साळुंखे, राहुल पाटील आणि रुबिना शेख यांनी केली.
..............