कोरोनामुळे एसटीचे चालक आले अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:06 IST2021-05-30T04:06:54+5:302021-05-30T04:06:54+5:30
नागपूर : कोरोनाच्या साथीने सगळेच त्रस्त झाले आहेत. एसटी महामंडळाचेही उत्पन्न ठप्प झाले आहे. अशा स्थितीत एसटी महामंडळाने माल ...

कोरोनामुळे एसटीचे चालक आले अडचणीत
नागपूर : कोरोनाच्या साथीने सगळेच त्रस्त झाले आहेत. एसटी महामंडळाचेही उत्पन्न ठप्प झाले आहे. अशा स्थितीत एसटी महामंडळाने माल वाहतूक सुरू केली; परंतु एसटीच्या चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. बाहेरगावी जाऊनही त्यांना आपल्या खिशातून खर्च करावा लागत आहे.
जिल्ह्यात एकूण ट्रक : २३
वाहतूक सुरू असलेले ट्रक : २२
कोरोनाकाळातील कमाई : १ कोटी ९१ लाख ६ हजार २५ रुपये
खिशातून होतो खर्च : एसटीचा चालक बाहेरगावी गेल्यानंतर परतीचा माल मिळेपर्यंत त्याला आपल्या खिशातून खर्च करावा लागतो. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आधीच कमी आहे. त्यातही त्यांना खिशातून खर्च करावा लागत असल्यामुळे असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.
वेतनातून होते कपात
एसटीची माल वाहतूक सुरू झाल्यानंतर मालवाहतुकीचे उत्पन्न वाढले आहे. बाहेरगावी जाताना एसटीच्या चालकांना भत्ता देण्यात येतो; परंतु हा भत्ता त्यांच्या वेतनातून कापण्यात येतो. आम्ही एसटीच्या कामासाठी गेलो असताना हा भत्ता आमच्या वेतनातून कापू नये, अशी मागणी एसटीचे चालक करीत आहेत.
भत्ता मिळावा
बाहेर गेल्यानंतर आमचा वैयक्तिक खर्च होतो. त्या खर्चाचे काहीच मिळत नाही. त्यामुळे कपात न करता भत्ता मिळावा.
-एक चालक
त्वरित परत बोलवावे
‘माल सांगितलेल्या ठिकाणी पोहोचविल्यानंतर चालकांना त्वरित परत बोलावणे गरजेचे आहे. जवळ पैसे नसल्यामुळे आमची अडचण होते. एसटी महामंडळाने याची दखल घ्यावी.’
-एक चालक
कर्मचाऱ्यांना भत्ता द्यावा
‘एसटीने माल वाहतूक सुरू केली आहे. त्यापासून एसटीला चांगले उत्पन्नही मिळत आहे; परंतु चालकांना भत्ता देण्यात येत नाही. त्यांना आपल्या खिशातून खर्च करावा लागत आहे. त्यासाठी माल पोहोचविल्यानंतर चालकांना त्वरित परत बोलवावे.
-अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना
................