नागपूर जिल्ह्यात भाजप काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 12:03 IST2020-01-08T12:02:56+5:302020-01-08T12:03:14+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी घेतलेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमधून भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार चुरस असल्याचे दिसत आहे.

नागपूर जिल्ह्यात भाजप काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी घेतलेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमधून भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार चुरस असल्याचे दिसत आहे.
पारडसिंगा सर्कल मध्ये राकॉचे शेखर कोल्हे, पारडसिंगा प.स मध्ये धम्मपाल गुलाब खोब्रागडे व लाखगांव प.स सर्कलमधून राकॉच्या निलिमा अनिल ठाकरे विजयी झाल्या आहेत.
येनवा जिल्हा परिषद मधुन शेकाप (राहुल देशमुख )गटाचे समीप उमप येनवा पंचायत समिती सर्कल मधुन रॉकाच्या अनुपमा अनुप खराडे तथा झिलपा प.स सर्कल मधुन रॉकाची चंदा शिवाजी देव्हारे विजयी झाल्या आहेत.
जिल्हा परिषद येरखेडा सर्कल मधून भाजपचे मोहन माकडे 158 मतांनी विजयी झाले असून गुमथळा जीप सर्कलमधून भाजपचे अनिल निधान विजयी तर
गुमथळा सर्कलमधून भाजपच्या पुनम माळोदे विजयी झाल्या आहेत. बेलोना गटातून राष्ट्रवादीच्या दीप्ती मूलताईकर विजयी झाल्या आहेत.