शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संपकरी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन, 'एकच मिशन जुनी पेन्शन'च्या घोषणांनी परिसर दणाणला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 13:06 IST

सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा 7 वा दिवस. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा याचाच भाग म्हणून थाळी बाजाव आंदोलन करण्यात आले.

नागपूर : जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय कर्मचारीसंपावर आहेत. सोमवारपासून (दि. २०) संपाचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. संपाबाबत अजुनही तोडगा निघालेला नाही. शासकीय कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यांनी दुसऱ्या आठवड्यातील आंदोलनाची रूपरेषाही ठरवली असून सोमवारी संविधान चौकात थाळीनाद आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. 'एकच मिशन जुनी पेन्शन', 'पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची'च्या घेषणांनी परिसर दणाणून टाकला. दरम्यान दुसऱ्या आठवड्यात या संपामुळे शासनाचे मोठे नुकसान होणार असून सर्वसामान्य नागरिकांचेही कामे अडल्याने त्यांनाही फटका बसणार आहे.

शनिवारी शासकीय कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढून आपल्या एकजुटीचा परिचय दिला. या मोर्चात विविध विभागातील हजारो शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन ‘एकच मिशन - जुनी पेन्शन’चा नारा बुलंद केला होता. राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. संविधान चौकात झालेल्या जाहीर सभेत मोर्चकऱ्यांनी समाधानकारक तोडगा निघत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार केला होता. तसेच आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार साेमवार, २० मार्च रोजी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यात तलाठी संघानेही कामबंद आंदोलन सुरू करत सहभाग नोंदवला. अवकाळी पावसाने शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिसकावला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आसवांचे तळे साठले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, संपात असलो तरी पंचनामे करणार अशी ग्वाही यावेळी आंदोलनकर्त्या तलाठ्यांनी दिली.

दरम्यान, २१ मार्च रोजी धरणे आंदोलन, २३ मार्च रोजी काळे झेंडे दाखविले जातील. २४ तारखेपासून ‘माझी पेन्शन-माझे कुटुंब’ हे अभियान राबविले जाणार आहे. एकीकडे संविधान चौकात विविध आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले जात आहे. तर दुसरीकडे शासकीय कार्यालये ओस पडल्याने संपूर्ण शासकीय कामकाज ठप्प पडले आहे. हा आर्थिक वर्षाचा महिना आहे. विविध विकास कामांचे कोट्यवधींचे बिल अडून पडले आहेत. विविध विभागांचे बिल कोषागारात पडून आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या विविध दाखल्यांची कामे बंद पडली आहेत. त्यामुळे या मोर्चाबाबत तोडगा निघाला नाही तर या आठवड्यात शासनाचे मोठे नुकसान होणार आहे.

टॅग्स :StrikeसंपPensionनिवृत्ती वेतनEmployeeकर्मचारीGovernmentसरकारnagpurनागपूर