सडकछाप मजनूंचा तरुणावर हल्ला

By Admin | Updated: January 3, 2017 02:43 IST2017-01-03T02:43:17+5:302017-01-03T02:43:17+5:30

एका युवतीची छेड काढत असणाऱ्या सडकछाप मजनूंना रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांनी गौतम दिलीप

Strikers attacked the youth | सडकछाप मजनूंचा तरुणावर हल्ला

सडकछाप मजनूंचा तरुणावर हल्ला

नागपूर : एका युवतीची छेड काढत असणाऱ्या सडकछाप मजनूंना रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांनी गौतम दिलीप टेंभूरकर (वय २१) नामक तरुणाला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. कळमन्यातील विजयनगरात रविवारी सायंकाळी ६.३० वाजता ही घटना घडली. धरमनगरातील रहिवासी टेंभूरकर सोमवारी सायंकाळी विजयनगरातील छत्तीसगडी सांस्कृतिक मंडळाजवळ गेले होते. तेथे आरोपी कपिल दशरथ शाहू (वय २०), दीपक दीनदयाल शाहू (वय २०) आणि सोनू शाहू (वय २१, सर्व रा. शिवनगर) हे एका मुलीची छेड काढताना दिसले. पीडित मुलीला धोका असल्याचे लक्षात आल्याने टेंभूरकरने आरोपींना विरोध केला. त्यामुळे आरोपींनी संगनमत करून धारदार शस्त्राने टेंभूरकर याच्या पसलीवर, हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केले.(प्रतिनिधी)

Web Title: Strikers attacked the youth