शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

संपाचा जनसामान्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 1:36 AM

सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी एसटी कर्मचाºयांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. संपामुळे कर्मचाºयांची दिवाळी अंधारातच गेली तर खासगी वाहतूकदार प्रवाशांच्या अडचणींचा फायदा घेत भाडे आकारत आहेत.

ठळक मुद्देगणेशपेठ बसस्थानक पडले ओस प्रवाशांची सुरक्षा धोक्यात खासगी वाहतूकदारांची चांदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी एसटी कर्मचाºयांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. संपामुळे कर्मचाºयांची दिवाळी अंधारातच गेली तर खासगी वाहतूकदार प्रवाशांच्या अडचणींचा फायदा घेत भाडे आकारत आहेत. एरवी हातात स्टेअरींग आणि तिकिटाची मशीन घेऊन बसमध्ये ड्युटी करणारे एसटीचे कर्मचारी मागील चार दिवसांपासून ड्युटी नसल्यामुळे गणेशपेठ आगाराच्या परिसरात थांबून आहेत. दरम्यान चौथ्या दिवशी संपकर्त्या कर्मचाºयांनी भजनाच्या माध्यमातून आपल्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कर्मचाºयांनी ढोल आणि टाळ मृदुंगाची खास व्यवस्था केली होती.ग्रामीण भागातील नागरिकांना मनस्तापएसटीच्या संपाचा फटका खºया अर्थाने ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक बसला. खेडेगावातील प्रवास व्यवस्था बºयाच अंशी एसटीवर अवलंबून असते. त्यामुळे गावापर्यंत येणारी एसटी बंद झाल्याने त्यांना गावावरून इतर साधने मिळतील अशा मोक्याच्या ठिकाणी पायी यावे लागते. त्यानंतरही खासगी साधने वेळेवर मिळतील याचा भरवसा नाही. विशेषत: काळीपिवळी, ट्रॅक्स अशी प्रवासी वाहने मार्गावरून धावतात. मात्र वाहनचालक गाडी भरून प्रवासी मिळेपर्यंत वाहने सोडत नाही. त्यामुळे अर्धा-एक तास वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी अक्षरश: कोंबले जातात. चालकांच्या सीटवरही प्रवाशांना बसवून असुरक्षितपणे भरधाव वेगाने गाडी चालविली जाते. दूरचा प्रवास करणारे अधिक प्रवासी नसल्यास मध्येच बसलेल्या प्रवाशांना उतरवून दुसºया गाडीने जाण्याचे सांगितले जाते. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे.भाडेवाढीमुळे होत आहेत भांडणेएसटी सुरू असताना खाजगी प्रवासी वाहने एसटीच्या तिकिटांपेक्षा कमी पैसे प्रवाशांकडून घेत असतात. मात्र संपामुळे एसटी बंद झाल्याने नागरिकांकडून अधिक पैसे उकळले जात आहेत. कुही ते नागपूरपर्यंत आधी ४० रुपये घेतले जायचे, मात्र संप सुरू होताच ६० ते ७० रुपये आकारले जात आहेत. अडचणीच्या काळात त्यापेक्षा अधिक पैसे घेतले जात आहेत. यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये भांडणाचे प्रकार होत आहेत.रुग्ण व ज्येष्ठांचे हालया संपामुळे विशेषत: अर्ध्या तिकिटाने प्रवास करणाºया ज्येष्ठ नागरिकांना आणि उपचारासाठी शहराकडे धाव घेणाºया रुग्णांना चांगलाच फटका बसला आहे. रुग्णाला सुरक्षितपणे प्रवास आवश्यक असतो. मात्र खासगी वाहनांमध्ये गर्दीत बसूनच त्यांना प्रवास करावा लागत आहे. एखाद्याला जखम असल्यास अधिकच त्रास सहन करावा लागतो आहे. अर्ध्या तिकीटने प्रवास करणाºया गरीब ज्येष्ठ नागरिकांना अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याने त्यांनाही मनस्ताप होत आहे.२०० कर्मचारी पडले अडकूनएसटी महामंडळाच्या गणेशपेठ आगारात सोमवारी रात्री बाहेरगावावरून एसटीची बस घेऊन आलेले कंडक्टर, ड्रायव्हर मागील चार दिवसांपासून अडकून पडले आहेत. दिवाळीचा सण सुरू असल्यामुळे आपण आपल्या कुटुंबापासून दूर असल्याचा भाव त्यांच्या चेहºयावर स्पष्ट जाणवत आहे. नागपुरात कुणीच राहत नसल्यामुळे हे कर्मचारी आणखीनच अडचणीत सापडले आहेत. साधारणत: ड्युटीवर जाताना कंडक्टर, ड्रायव्हरच्या खिशात मोजके पैसे असतात. त्यामुळे चार दिवसांपासून ते नागपुरात मुक्कामी असल्यामुळे त्यांच्या भोजनाची व्यवस्था कशी होईल हा प्रश्न असताना नागपुरातील स्थानिक एसटी कर्मचाºयांनी आपली जबाबदारी ओळखून या २०० कर्मचाºयांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी कर्मचारी स्वेच्छेने पैसे गोळा करून सकाळ-सायंकाळी भोजन तयार करीत असल्यामुळे या कर्मचाºयांची मोठी सुविधा झाली आहे. यासाठी एसटी महामंडळाचे स्थानिक कर्मचारी अजय हट्टेवार, शशिकांत वानखेडे, पुरुषोत्तम इंगोले, अरुण भागवत, सुनील राठोड, निशिकांत घोंडसे, अतुल निंबाळकर, प्रशांत बोकडे, माधुरी ताकसांडे, सविता केवाळे, प्रज्ञाकर चंदनखेडे, दिलीप महाजन, दिलीप माहुरे, दीपक बागेश्वर आदींनी पुढाकार घेतला आहे.तर कुटुंबासह जेलभरो करणारप्रवाशांना वेठीस धरणे हे आमचे धोरण नाही. प्रवासी हे आमचे दैवत आहे. सरकारने तोडगा काढावा. प्रवाशांची सोय शासनाने जरूर करावी परंतु त्यांच्या सुरक्षेचाही विचार करावा. सरकार व प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा. हा संप असाच दीर्घकाळ चालला तर कृती समिती कुटुंबासह जेलभरो आंदोलन करेल.- अजय हट्टेवार , विभागीय सचिव, एसटी कामगार संघटनासरकार व प्रशासनाने लादलेला संपसंघटनेच्यावतीने आम्ही ४० दिवसांपूर्वी संपाची नोटीस दिली होती. त्यानंतर १४ दिवसांची नोटीस दिली. परंतु शासन व प्रशासनाने काहीही पाऊल उचलले नाही. चर्चाही केली नाही. एक दिवसापूर्वी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. त्यात निर्णय होऊ शकला नाही. दुसरीकडे आमचे पालक असलेले परिवहन मंत्री यांनी पुढाकार घेऊन आमची बाजू ऐकून घेण्याची गरज होती. परंतु तसे न करता त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले. त्यामुळे हा संप एसटी कर्मचारी आणि प्रवाशांवर शासन आणि प्रशासनाने लादलेला आहे.- सुभाष गोजे , राज्य प्रसिद्धी प्रमुख, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)भाऊ-बहिणीच्या प्रेमात उभा ठाकला संपबसस्थानकावरून परतल्या बहिणी :-तर ओवाळणीला मुकतील अनेक भाऊलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा मंगल आणि उत्कृष्ट सण म्हणजे भाऊबीज. सासूरवाशीण बहीण जेव्हा भाऊबीजेला भावाच्या घरी येते तेव्हा ती एकटी येत नाही. तिच्यासोबत येतात आनंद, उत्साह आणि चैतन्य. ओवाळणीच्या ताटात तेवणाºया पणत्या करीत असतात भावाच्या दीर्घायुष्याची कामना. हे आनंदी चित्र तसे दरवर्षीचेच. यात कधी खंड पडत नाही. पण, यंदा मात्र भाऊ-बहिणीच्या या प्रेमात एसटीचा संप उभा ठाकला आणि पहिल्यांदा ओवाळणीला मुकावे लागले. संप मिटला असेल या भाबड्या अपेक्षेत भावाच्या गावाला जाण्यासाठी आलेल्या अनेक बहिणी निराश मनाने बसस्थानकावरून परत फिरल्या. यावेळी लोकमतने नागपूर बसस्थानकावर अनुभवलेली त्यांच्या मनाची अवस्था शब्दातीत आहे. यातील अनेक महिला ग्रामीण भागातल्या होत्या. आधीच घरची आर्थिक स्थिती बेताची. दोन वेळच्या अन्नाचा संघर्ष पाचवीलाच पुजलेला. तरीही भावाच्या घरी जाताना रिकाम्या हाताने कसे जावे म्हणून अनेकींनी पदरमोड करून भेटवस्तू घेतली. एसटी ही परडणारी वाहन सेवा. पण, एसटीच्या कर्मचाºयांनी संप पुकारल्याने या महिलांची कोंडी झाली. खासगी वाहनाने जातो म्हटले तर अतिरिक्त पैसे जवळ नाही. तिकडे खासगी वाहनधारकांनीही अव्वाच्या सव्वा भाव वाढवलेले. आपण श्रीमंत असतो, आपल्याकडेही पैसे असते तर भाऊबीजेत खंड पडला नसता, अशी स्त्रीमनाची हळवी खंत या महिला व्यक्त करीत होत्या. यात जशा रायपूर येथील रहिवासी उमा तागडे होत्या तशाच मानेवाडा परिसरात राहणाºया मंदा भारस्करही होत्या. सर्वांच्या नजरा एसटी बसच्या रुतलेल्या चाकावर खिळल्या होत्या आणि बस एका क्षणालाही पुढे सरकायला तयार नव्हती.