कळमेश्वर शहरासह तालुक्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:08 IST2021-04-11T04:08:42+5:302021-04-11T04:08:42+5:30
कळमेश्वर : कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने करण्यात आलेल्या वीकेंड लॉकडाऊनला कळमेश्वर-ब्राह्मणी नगर परिषद क्षेत्रासह ग्रामीण भागातील नागरिकांनी शनिवारी प्रतिसाद ...

कळमेश्वर शहरासह तालुक्यात कडकडीत बंद
कळमेश्वर : कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने करण्यात आलेल्या वीकेंड लॉकडाऊनला कळमेश्वर-ब्राह्मणी नगर परिषद क्षेत्रासह ग्रामीण भागातील नागरिकांनी शनिवारी प्रतिसाद दिला. तालुक्यातील मोहपा, कोहळी,धापेवाडा, तेलकामठी, गोंडखैरी व इतर परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांनीही बंद पाळत सरकारच्या नियमांचे पालन केले. मेडिकल, दवाखाने, किराणा दुकान, डेली निड्स, भाजीपाला, फळे व इतर आवश्यक गरजा वगळता मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कळमेश्वर शहरातील रिक्षा, इतर प्रवासी वाहने बंद असल्याने नागरिकही रस्त्यावर कमी प्रमाणात होते. सकाळी ७ पासून गजबजणारी ठिकाणे ओस पडलेली यावेळी दिसून आली. जनतेने शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा. सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझर वापरून स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सचिन यादव यांनी केले.