रामटेक शहरात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST2021-04-13T04:08:35+5:302021-04-13T04:08:35+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी रामटेक शहरात रविवारी (दि. ११) कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील दवाखाने ...

Strictly closed in Ramtek city | रामटेक शहरात कडकडीत बंद

रामटेक शहरात कडकडीत बंद

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी रामटेक शहरात रविवारी (दि. ११) कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील दवाखाने व औषधांची दुकाने वगळता सर्व दुकाने व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली हाेती. काहीजण भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात आले हाेते. मात्र, त्यांना रिकाम्या पिशव्या घेेऊन घरी परतावे लागल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला.

विशेष म्हणजे, रविवारी रामटेक शहरात आठवडी बाजार भरताे. या बाजारात स्थानिक नागरिकांसह परिसरातील गावांमधील नागरिक, शेतकरी व कामगार माेठ्या संख्येने खरेदी करण्यासाठी येत असल्याने या आठवडी बाजाराचा व्याप माेठा असताे. मात्र, स्थानिक दुकानदार व व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत रविवारीच आपापली दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने तसेच कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेत त्याची काटेकाेर अंमलबजावणी केली. त्यामुळे शहरात दवाखाने व औषधांची दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद हाेती.

शहरातील किराणा व इतर वस्तूंची दुकाने, भाजीपाला व मटण मार्केट तसेच दारूची दुकानेही बंद ठेवण्यात आली हाेती. ग्रामीण भागातील नागरिकांनीही भाजीपाला विकायला आणला नव्हता. काही हाैशी मंडळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली हाेती. ते आठवडी बाजार परिसरात पाेहाेचताच त्यांना तिथे एकही दुकान दिसले नाही. त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने घरी परत यावे लागले. रस्त्यांवर तुरळक प्रमाणात फिरणारी ही मंडळी वगळता बहुतेकांनी दिवसभर घराबाहेर पडणेही टाळले हाेते.

...

प्रवासी वाहतूक सुरू

शहरातून एसटीची व खासगी प्रवासी वाहतूक सुरू हाेती. राेडवर काही हाैशी नागरिक फिरत व गर्दी करीत असल्याचे लक्षात येताच त्यांनाही त्यांच्या घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या हाेत्या. नागरिक भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असल्याने भाजीपाल्याची दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. दरम्यान, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, मास्कचा नियमित वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, हात वारंवार साबणाने धुवावे, गर्दी करणे व गर्दी जाणे टाळावे, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले आहे.

Web Title: Strictly closed in Ramtek city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.