भिवापुरात कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:08 IST2021-04-17T04:08:01+5:302021-04-17T04:08:01+5:30

भिवापूर : राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्यात १५ दिवसासाठी संचारबंदी लागू केली आहे. भिवापूर शहरात याची कडक अंमलबजावणी ...

Strict lockdown in Bhivapur | भिवापुरात कडक लॉकडाऊन

भिवापुरात कडक लॉकडाऊन

भिवापूर : राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्यात १५ दिवसासाठी संचारबंदी लागू केली आहे. भिवापूर शहरात याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेत शुकशुकाट आहे. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी ठाणेदार महेश भोरटेकर यांच्यासह संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांनी टीम शुक्रवारी रस्त्यावर उतरली. त्यांच्या सहकार्यासाठी नगर पंचायत कर्मचारी व वाहतूक पोलिसही खांद्याला खांदा लावून कर्तव्यावर आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठ बुधवारपासून कडेकोट बंद आहे. मात्र गल्लीबोळातील काही घरगुती दुकाने सुरू असून त्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर, गर्दीबाबत सूचनांचे पालन होत नसल्याची बाब समोर येताच भोरटेकर यांनी शुक्रवारी सकाळपासूनच संपूर्ण पोलिसांसह शहरातील प्रत्येक अंतर्गत रस्त्यावर गस्त सुरू केली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुठलीही दुकाने लपूनछपून सुरू असल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे. मार्केट बंद असतानाही शहरातील काही तरुणांचे टोळके विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याची बाब समोर येताच पोलिसांनी त्यांना घरचा रस्ता दाखविला. नगर पंचायतचे पथक विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करीत आहे. अत्यावश्यक व जीवनावश्यक बाब म्हणून दुकान सुरू असल्यास तेथेदेखील गर्दी होऊ नये, मास्क व सॅनिटायझरचा वापर नियमित व्हावा, यासाठी प्रशासन आग्रही आहे. नियमाचे पालन न झाल्यास कारवाई करण्याचा दमही प्रशासनाने त्यांना दिला आहे.

Web Title: Strict lockdown in Bhivapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.