रामटेकमध्ये लाॅकडाऊनचे तंताेतंत पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST2021-04-07T04:08:55+5:302021-04-07T04:08:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : काेराेनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले आहे. काेराेना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी ...

रामटेकमध्ये लाॅकडाऊनचे तंताेतंत पालन
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : काेराेनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले आहे. काेराेना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी लाॅकडाऊनचे तंताेतंत पालन हाेणे गरजेचे आहे. यासाठी रामटेक शहरात प्रशासनातर्फे कडक कारवाई केली जात आहे. मंगळवारी (दि. ६) शहरात सर्व शुकशुकाट बघायला मिळाला. लाॅकडाऊनमुळे केवळ भाजीपाला, फळविक्रेते, किराणा व अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद हाेती. लाॅकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
नगर परिषद, महसूल प्रशासन व पाेलीस पथक तैनात असून, नियमांचे उल्लंघन करणारे नागरिक व दुकानदारांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. दुकानदार व विक्रेत्यांना काेविड चाचणी करणे नगर परिषदेने आवश्यक केले आहे. तसेच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लसीकरण करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. यासाठी तहसील प्रशासन, पाेलीस व नगर परिषद प्रशासनाची चमू कार्यरत आहे. नगर परिषदेचे अधिकारी राजेश सव्वालाखे यांनी सांगितले की, काेविड चाचणी व लसीकरण सर्व अत्यावश्यक सेवांच्या दुकानदारांना बंधनकारक केले आहे. लाॅकडाऊनदरम्यान नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.