शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कायदा मोडणाऱ्यांची गय नाही; अमितेश कुमार यांची हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 22:21 IST

आतापर्यंतच्या अधिकाऱ्यांनी नागपुरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्याचे जे प्रयत्न केले ते अनुकरणीय आणि प्रशंसनीय आहेत. यापुढेही कुणी कायदा हातात घेऊ पाहत असेल तर त्याची कोणत्याच किमतीत गय केली जाणार नाही, असा इशारा नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

ठळक मुद्देजान-मालाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांच्या जान-मालाच्या सुरक्षेला आपले सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून नागपूर तसे पाहता शांत आहे. येथील पोलिसांची इमेजही खूप छान आहे. आतापर्यंतच्या अधिकाऱ्यांनी नागपुरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्याचे जे प्रयत्न केले ते अनुकरणीय आणि प्रशंसनीय आहेत. यापुढेही कुणी कायदा हातात घेऊ पाहत असेल तर त्याची कोणत्याच किमतीत गय केली जाणार नाही, असा इशारा नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

पोलीस आयुक्तालयात पत्रकारांशी त्यांनी शुक्रवारी सायंकाळी अनौपचारिक चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, १३ वर्षांनंतर आपण पुन्हा नागपुरात कर्तव्य बजावण्यासाठी आलो आहे. या आधीच्या आपल्या सर्व वरिष्ठ सहकाºयांनी नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेची घडी अत्यंत व्यवस्थित बसविली आहे. नागपूरकर जनता नेहमीच पोलिसांना सहकार्य करते, हा आपला यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे जनतेचे सहकार्य मिळवून नागपूर पोलिसांची प्रतिमा आदर्श कशी ठरेल, याकडे आपण कटाक्षाने लक्ष देणार आहोत. हद्दपारी, एमपीडी, मकोका सारखे कायद्याचे कठोर शस्त्र उगारून आपण येथील गुन्हेगारी मोडून काढू. शहरातील वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष देऊ आणि अपघातमुक्त शहर कसे होईल याकडे कटाक्ष ठेवू ,असेही त्यांनी सांगितले. गुन्हेगार आणि येथील पोलिसिंग या दृष्टिकोनातून नागपूरला एक आदर्श शहर बनविण्यासाठी आपले कसोशीने प्रयत्न राहणार आहेत. किती दिवसात काय करणार हे मी आत्ता सांगणार नाही. मात्र तुम्हाला त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील, असा विश्­वासही त्यांनी व्यक्त केला.गंभीर प्रकरणांचा छडा लावूमहापौर गोळीबार प्रकरण, राणे प्रकरण, सुजल वासनिक अपहरण तसेच शहरातील आतापर्यंत अनेक प्रकरणे उलगडण्यात पोलिसांना यश आले नाही, त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर बोलताना आपण सर्वच प्रकरणांचा छडा लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू आणि त्यात यशही मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील कोरोनाची स्थिती आणि पोलिस या संबंधाने प्रश्न उपस्थित झाले असता त्यांनी खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबवू, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मदतीने कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.मी कधीही उपलब्ध!नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचा कायद्याचा हक्क अबाधित राखण्यासाठी मी कोणत्याही वेळेला उपलब्ध राहीन, अशी हमी अमितेश कुमार यांनी दिली. 

 

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय