शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

नागपुरात  मोकाट जनावरांच्या मालकांना चाप  :  १० मालकांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 8:50 PM

पशुपालक शहरातील विविध भागात मोकाट जनावरे सोडून देतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याची गंभीर दखल घेत महापालिकेने आता या पशुपालकांनाच चाप लावण्याची भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देमनपा आयुक्तांनी घेतली गंभीर दखल

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : पशुपालक शहरातील विविध भागात मोकाट जनावरे सोडून देतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याची गंभीर दखल घेत महापालिकेने आता या पशुपालकांनाच चाप लावण्याची भूमिका घेतली आहे. बुधवारी मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलीस ठाण्यात पाच व यापूर्वी केलेल्या तक्रारीच्या आधारे पाच अशा एकूण १० जनावरे मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या जनावर मालकांविरुद्ध कारवाईचा विषय मनपा आयुक्तांनी गंभीररीत्या घेतला असून, जनावर मालकांना आपली जनावरे मोकाट न सोडण्याचे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे. शहरातील बाजाराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरे आढळून येत असल्यामुळे बाजाराच्या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. गीता गणेश सहारे, रा. इमामवाडा रोड, गुजरवाडी, अजमत अमनउल्ला खान, रा. लोधीपुरा बजेरिया, फिरोज नूर खान रा. लोधीपुरा हज हाऊस, गणेश नत्थूजी सहारे, इमामवाडा रोड, गुजरवाडी, सतीश शर्मा रा. सुभाष रोड, आग्याराम देवी रोड ही गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या सर्व लोकांनी त्यांची जनावरे कॉटन मार्केट परिसरात मोकाट सोडली होती. महापालिकेच्या पथकाद्वारे १९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारीदरम्यान मोकाट जनावरांना पकडण्याची कार्यवाही करण्यात आली होती. संबंधित मालकांच्या जनावरांना पकडून मनपाच्या पथकाने बंदिस्त केले होते. या कारवाईनंतर जनावरांच्या मालकांनी त्यांना सोडविले. जनावर मालकांद्वारे जनावरे मोकाट सोडण्यात आल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला, यामुळे अपघाताची शक्यताही बळावली होती. यासंदर्भात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात मनपाने केलेल्या कारवाईची माहिती देत २५ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. जनावर मालकांवर मुंबई पोलिस कायद्यातील कलम ९० (अ), १०२, ११७ तसेच इतर प्रचलित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती करण्यात आली होती.या तक्रारीच्या आधारे गणेशपेठ पोलिसांनी संबंधित जनावर मालकांवर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या वतीने डॉ. गजेंद्र महल्ले यांनी १७ फेब्रुवारी रोजी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पाच जणांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोठे शहराबाहेर बांधा जनावर मालकांनी शहराबाहेर गोठे बांधावीत, असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात आले असून मोकाट जनावरांना बंदिस्त करण्याची मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून, ती अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका