नागपुरात पावसाचे झंझावाती आगमन; बळीराजासह नागरिक सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 14:41 IST2021-06-08T14:18:23+5:302021-06-08T14:41:33+5:30

Nagpur News दोन दिवसांच्या असह्य उकाड्यानंतर सोमवारी दुपारी आकाशात पाहता पाहता काळे ढग गोळा झाले आणि वादळीवाऱ्यासह नागपुरात मान्सूनचे जोरदार पदार्पण झाले.

Stormy arrival of monsoon in Nagpur; Citizens rejoiced with farmers | नागपुरात पावसाचे झंझावाती आगमन; बळीराजासह नागरिक सुखावले

नागपुरात पावसाचे झंझावाती आगमन; बळीराजासह नागरिक सुखावले



लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: दोन दिवसांच्या असह्य उकाड्यानंतर सोमवारी दुपारी आकाशात पाहता पाहता काळे ढग गोळा झाले आणि वादळीवाऱ्यासह नागपुरात मान्सूनचे जोरदार पदार्पण झाले.
यंदा पावसाचे आगमन वेळेवर होणार याची वार्ता असली तरी, लहरी पावसाचा काही नेम नाही म्हणून बळीराजा धास्तावला होता. तसेच कडक उन्हं व असह्य उकाडा याने नागरिकही त्रस्त झाले होते. आज कोसळलेल्या पर्जन्यवृष्टीने शेतकऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

Web Title: Stormy arrival of monsoon in Nagpur; Citizens rejoiced with farmers