वादळाचा वीज यंत्रणेला तडाखा
By Admin | Updated: June 10, 2016 03:02 IST2016-06-10T03:02:11+5:302016-06-10T03:02:11+5:30
उपराजधानीत बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळाचा महावितरण आणि एसएनडीएलच्या वीज यंत्रणेला चांगलाच तडाखा बसला.

वादळाचा वीज यंत्रणेला तडाखा
नागपूर : उपराजधानीत बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळाचा महावितरण आणि एसएनडीएलच्या वीज यंत्रणेला चांगलाच तडाखा बसला. यात शहरातील बहुतांश वीज यंत्रणा विस्काळीत होऊन अनेक वस्त्यांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. यामध्ये काही वस्त्या रात्रभर अंधारात बुडाल्या होत्या. महावितरणच्या काँग्रेसनगर व बुटीबोरीसह अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. यानंतर महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत तत्परता दाखवीत बहुतांश भागातील वीजपुरवठा काही वेळेतच सुरळीत केला. बुधवारी सायंकाळी तब्बल अर्धा तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. यामुळे महावितरणच्या धंतोली, शंकरनगर, धरमपेठ, साईमंदिर, सावरकरनगर, छत्रपतीनगर, विकासनगर व रामकृष्णनगर य भागातील वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने खंडित झाला होता. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी यापैकी बहुतांश भागातील वीजपुरवठा अर्धा ते एक तासाच्या आत सुरळीत केला. त्याच वेळी एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांना मात्र गुरुवारी दुपारपर्यंत कसरत करावी लागली. मात्र तरीसुद्धा सर्व वस्त्यांमधील वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. काटोल रोड परिसर हा रात्रभर अंधारात बुडाला होता. (प्रतिनिधी)
अपघात
टाळण्यासाठी टीप्स!
१) पावसात मोबाईलवर बोलणे टाळा.
२) उच्चदाब वाहिनीखाली उभे राहून
फोटो काढू नका. कारण
फ्लॅशमधून वीज येऊ शकते.
३) झाडाखाली पावसात उभे राहू नका.
४) विजेच्या खांबाला जनावरे बांधू नका.
५) विजेच्या खांबाला पावसात हात
लावू नका.
६) ओल्या बांबूने आकडा टाकून
वीजचोरी करून स्वत:चा जीव
धोक्यात घालू नका.