शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:51 IST

महाराष्ट्र सरकारने गेल्या दीड वर्षांत मागासवगीर्यांच्या ४० हजार कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रातच याचा उल्लेख केल्याची माहिती स्वतंत्र्य मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देमजदूर युनियनचे पाटील यांचा आरोपयुनियन सचिव गणेश उके यांचा सपत्नीक सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र सरकारने गेल्या दीड वर्षांत मागासवगीर्यांच्या ४० हजार कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रातच याचा उल्लेख केल्याची माहिती स्वतंत्र्य मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील यांनी दिली. एका कार्यक्रमात ‘मागासवर्गीय कर्मचारी, अधिकारी यांचे पदोन्नती धोरण आणि पुढील दिशा’ या विषयावर ते बोलत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार प्रशिक्षण केंद्र, हजारी पहाड, प्रेरणा नगर येथे संघटन सचिव गणेश उके आणि त्यांच्या पत्नी वनमाला उके यांचा सत्कार सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला. व्यासपीठावर आमदार डॉ. मिलिंद माने, विकास गौर, सतीश ओटके होते. जे.एस. पाटील यांनी सांगितले, महाराष्ट्र सरकारने २९ डिसेंबर २०१७ ला परिपत्रक काढले. त्यानुसार अनुसूचि जाती आणि जमातीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे थांबण्यात आले. मात्र, खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जात आहे. विशेष म्हणजे मागावर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबणारे आणि खुल्या प्रवर्गाला पदोन्नती आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात २९ डिसेंबर २०१७ ते २९ मे २०१९ पर्यंत ४० हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आले नसल्याचे नमूद केले आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांसह महामंडळातील सुमारे २० हजार कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित झाले असूल अशाप्रकारे ६० कर्मचारी पदोन्नतीतील आरक्षणपासून वंचित आहेत, असेही ते म्हणाले.सत्काराला उत्तर देताना गणेश उके म्हणाले, ही लढाई केवळ आरक्षणाची नाहीतर सामाजिक आहे. आपण फक्त कर्मचारी, अधिकाऱ्यांचेच हित बघत नाही तर गवंडी कामगार, अंगणवाडी सेविका, शेतमजूर, पेट्रोल पम्प, सुरक्षा रक्षक, संघटित, असंघटित कामगारांसाठी देखील काम करतो. ही संघटना समानतेच्या तत्त्वावर चालते. या संघटनेत सर्व कर्मचारीवर्ग समान आहेत, असेही संघटन सचिव गणेश उके म्हणाले. डॉ. मिलिंद माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक एन.बी. जारोंडे यांनी तर संचालन वाय.के. कांबळे यांनी केले. दिनेश बोरकर यांनी आभार मानले.

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीEmployeeकर्मचारी