मिहान प्रकल्पग्रस्तांचा १ मार्चला रास्ता रोको
By Admin | Updated: February 22, 2015 02:22 IST2015-02-22T02:22:34+5:302015-02-22T02:22:34+5:30
शिवणगावच्या विक्तुबाबानगरातील मिहान प्रकल्पग्रस्त १ मार्चला चिंचभुवन पुलावर रास्ता रोको करणार आहेत. मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीचे सचिव नटराज पिल्ले ...

मिहान प्रकल्पग्रस्तांचा १ मार्चला रास्ता रोको
नागपूर : शिवणगावच्या विक्तुबाबानगरातील मिहान प्रकल्पग्रस्त १ मार्चला चिंचभुवन पुलावर रास्ता रोको करणार आहेत. मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीचे सचिव नटराज पिल्ले यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
५० वर्षांपूर्वी वसलेल्या या वस्तीत अद्याप शाळा, रुग्णालय किंवा चांगल्या नागरी सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेल्या नाही. मिहान प्रकल्पाचा फटका वस्तीतील नागरिकांना बसला. त्यामुळे प्रत्येकाला १० लाख रुपये मोबदला मिळावा, १५०० चौरस फूट जागा मिळावी, बीपीएल हेल्थ कार्ड मिळावे आणि येथील बेरोजगारांना नोकरी, रोजगार प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगारांसाठी कर्ज मिळावे, अशी मागणी शिवणगाववासीयांची आहे. पिल्ले यांच्या माहितीनुसार, उपरोक्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रकल्पग्रस्तांनी सरकारकडे, मिहानच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार अर्जविनंत्या केल्या; मात्र आश्वासनापलीकडे काही मिळत नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे ते म्हणाले. विक्तुबाबानगरातील रहिवासी १ मार्चला दुपारी १२.३० वाजता रास्ता रोको आंदोलन सुरू करतील, असेही पिल्ले यांनी सांगितले. पत्रपरिषदेला समितीचे अध्यक्ष संजय बोडे, सुरेश शंभरकर, इमानउल हेमरून आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)