कर वसुली न केल्यास वेतन थांबवा
By Admin | Updated: July 29, 2015 03:08 IST2015-07-29T03:08:24+5:302015-07-29T03:08:24+5:30
कर वसुलीचे दिलेले उद्दिष्ट निर्धारित कालावधीत पूर्ण न केल्यास संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन थांबवण्याचे निर्देश

कर वसुली न केल्यास वेतन थांबवा
रमेश सिंगारे यांचे निर्देश : उद्दिष्टपूर्ती न झाल्यास कारवाई
नागपूर : कर वसुलीचे दिलेले उद्दिष्ट निर्धारित कालावधीत पूर्ण न केल्यास संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन थांबवण्याचे निर्देश मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी सोमवारी दिले. त्यांनी हनुमाननगर व धंतोली झोनच्या कर विभागाचा आढावा घेतला. यावेळी कर वसुली व आकारणी समितीचे सभापती गिरीश देशमुख उपस्थित होते.
कर वसुली विभागातील कर्मचाऱ्यांनी मनपाचे हित लक्षात घेता कर्तव्य भावनेतून कर वसुलीचे काम करावे. झोनमध्ये किती मालमत्ता आहे, किती देयके वाटण्यात आली, याचा वॉर्डनिहाय आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कर वसुलीच्या कामात चुकारपणा खपवून घेतला जााणार नाही. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. प्रशासनाने कर वसुलीसंदर्भात केलेल्या उपाययोजना, वित्त वर्षातील नियोजन, थकबाकी याचा आढावा घेण्यात आला. खुल्या प्लॉटचा सर्वे करून त्यावर कर आकारणी करा. शासकीय व निमशासकीय इमारती, सभागृह, हॉटेल यांच्याकडे थकबाकी असल्यास नियमाप्रमाणे कारवाई करा. जनजागृतीसाठी वॉर्डात प्रचार करून कर भरण्यास लोकांना प्रवृत्त करा, अशा सूचना त्यांनी केल्या. हनुमाननगर झोनच्या बैठकीला सभापती सारिका नांदूरकर, कर विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, झोनचे सहायक आयुक्त राजेश भिवगडे, सहायक कर निर्धारक गौतम पाटील, कर विभागाचे श्रीकांत वैद्य यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
धंतोली झोनच्या बैठक ीला सभापती लता यादव, सहायक आयुक्त सुभाष जयदेव, कर विभागाचे निरीक्षक व कमंचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)