शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डेपोतून पुरवठा बंद; पंप कोरडे, ड्रायव्हर्सच्या शंकांचे निरसन करा; विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन

By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 2, 2024 20:31 IST

प्रशासनाने पुढाकार घ्यावा

नागपूर : तेल कंपन्यांच्या डेपोतून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होत नसल्याने नागपूर जिल्ह्यातील ३०० पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपला आहे. ही स्थिती ट्रक आणि टँकरचालकांच्या आंदोलनामुळे निर्माण झाली आहे. पुरवठा सुरळीत झाल्यास पंप पुन्हा सुरू होतील, अशी ग्वाही विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी मंगळवारी परिषदेत दिली.

संप पंपचालकांचा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तिन्ही कंपन्यांच्या डेपोतून सोमवारी शहरात ८० टँकर तर मंगळवारी २० टँकरने पेट्रोलचा पुरवठा झाला. चर्चेतून तोडगा न निघाल्यास बुधवारी जिल्ह्यातील एकूण ३०० पंपांवर पेट्रोल आणि डिझेल विक्रीसाठी उपलब्ध राहणार नाही. सरकारकडून ड्रायव्हर संघटनांना काहीही आश्वासन न मिळाल्याने संप निवळण्याची काहीही चिन्हे दिसत नाहीत. सोशल मीडियातील चुकीच्या वृत्तामुळे ड्रायव्हरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

गुप्ता म्हणाले, भारतीय न्याय संहिता सुधारणा विधेयक भारत राजपत्र राष्ट्रपती यांच्या स्वाक्षरीने २५ डिसेंबरला प्रकाशित झाले. तेव्हापासूनच विरोध सुरू झाला आहे. विरोधाचे प्रमुख कारण हे सोशल मीडियाद्वारे प्रकाशित करण्यात येणारी अर्धवट माहिती आहे. त्यामुळे सर्वच ड्रायव्हरच्या मनात भीतीचे वातावरण पसरल्याने सर्वांचा आंदोलनात सहभाग दिसत आहे. हा कायदा सर्वांसाठीच आहे. त्यामुळे भीती न बाळगता सर्व शंकांचे निरसन करून ड्रायव्हर्सनी कामावर परत यावे. याकरिता सरकारनेही पुढाकार घेऊन त्यांचे निरसन करावे.  प्रशासन, तेल विपणन कंपन्या, डिलर्स, वाहतूकदार पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत असून नागरिकांनी संयम पाळावा, असे आवाहन गुप्ता यांनी केले. पत्रपरिषदेत हरजीतसिंग बग्गा, प्रणय पराते, जितेंद्र अग्रवाल, बबलू भाटिया, अनिरुद्ध देशमुख उपस्थित होते.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलVidarbhaविदर्भ